मद्यप्रेमींची चिंता वाढली! विदेशी दारू महागली; 'महाराष्ट्र मेड लिकर 'सह बीयरला पसंती
शासनाने विदेशी दारूवर १० टक्के व्हॅट, १५ टक्के परवाना शुल्क आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू केल्यामुळे जून महिन्यापासून किमतीत मोठी वाढ झाली. याचा थेट परिणाम विक्रीवर झाला असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये बाजारात आलेल्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ने मद्यपींना स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. धान्यावर आधारित असलेल्या ४२.८% एबीव्ही असलेल्या या मद्याची अवघ्या पाच महिन्यांत ७ लाख २७ हजार ३०२ लिटर विक्री झाली.
विदेशी दारूच्या किमती वाढल्याने मध्यमवर्गीय ग्राहकांनी आपला कल किअर आणि देशी दारूकडे वळवला आहे. अतिरिक्त शुल्कः हटिल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्रीवर आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कामुळे विदेशी दारूची मागणी घटली आहे. परवडणारी किंमत आणि १८० मिलीच्या बाटलीत उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र मेड लिकर’ला मद्यविक्रेत्यांकडूनही मोठी मागणी आहे.
देशी दारू विक्रीत वाढ
२०२५-२६ मध्ये एकूण विक्री २.३२.७२,१६५
२०२४-२५ मध्ये शिक्री २.१५.१६,०१५
वाद १७,५६,१५० (८%)
बिअरच्या विक्रीत २४ टक्क्यांची वाढ झाली असून, विदेशी दारू सोडून मद्यापीनी बिअरला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे, महसूल रचनेत बदलाची विन्हेंविदेशी दारूच्या विक्रीत घट झाली असली, तरी बिअर आणि देशी दारूच्या वाढत्या खपामुळे उत्पाद शुल्क विभागाच्या महसुलात समतोल राखला जाण्याची शक्यता आहे. वाईन विक्रीत मात्र समिष कल असून, आगामी काळात एमएमएल सारख्या स्थानिक उत्पादनांमुळे महाबाजारात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.
२०२५-२६ विक्री १,१७,८१,४०९
२०२४-२५ विक्री १,४१,५२,९४९
घट -२३,७१,२४० (-१७%)
२०२५-२६ विक्री १,६३.८४.७३१
२०२४-२५ विक्री १,३२.६४.३६०
वाढ ३१,२०,३७१ (२४%)






