
पतंगावरही 'जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला', १२० ते १ हजार रुपयापर्यंत किंमत; गुजरातचे आकर्षक पतंग नाशिकमध्ये विक्रीस दाखल
साधरणतः मध्यम आकाराच्या पंतगाची किमंत १२० ते १५० रूपयापर्यंत असून एका पॅकेटमध्ये १० पंतग मिळत आहे. तर मोठ्या आकाराचा कापडी पंतग १ हजार रुपयांना विकला जात आहे. तर चिमुकल्यांसाठी अगदी तळहातावर मावतील एवढ्या आकाराचे बेबी पंतग १५ रुपयांना पॅकेट या भावाने विक्रीस उपलब्ध आहे. तसेच शहरात फोफावलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून शहर पोलीस आयुक्तलयातर्फे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे.
यंदा विक्रेत्यांकडे चायनीज डेंगन हा नवीन प्रकारचा पंतग विक्रीस आला आहे. अगदी छोट्या आकाराचा हा पंतग लहान लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे. या पंतगाला फिशिंग स्टिक चिकटवून हा पंतग उडविला जातो. जास्त उंच न जाणारा परंतु उडविण्यास अगदी सोपा असल्याने लहान मुलांसाठी चायनीज ड्रॅगन हा पंतग आकर्षण ठरत आहे.
गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत असतानाच विक्रीस आलेल्या पंतगावर देखील नाशिक जिल्हा कायदयाचा बालेकिल्ला’ असा संदेश झळकत आहे. पोलिसांची ही धडाकेबाज कारवाई नागरिकांच्या मनामध्ये इतकी रुजली आहे की, सण उत्सवांमध्ये पोलिसांनी केलीली कारवाई ट्रेंड म्हणून समोर येत आहे.
पतंग उडविण्यासाठी चक्री महत्वाची असते. या चक्रीला दोरा गुंडाळून पतंग उडविला जातो. या चक्रीमध्ये देखील आता नवनवीन प्रकार दिसून येत आहे. यंदा अत्यंत सुबक अशी डिजाईन केलेली २ हजार रुपयांची चक्री बाजारात विक्रीस आली आहे. याशिवाय सध्या प्लॅस्टीक मटेरियलपासून बनविल्या चक्री ८० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.