
suvarna vaze murder case
नाशिक : शहरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक (Nashik) मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr.Suvarna Vaze Murder Case) यांच्या हत्येतील मुख्य संशयित पती संदीप वाजे (Sandip vaze) याला इगतपुरी न्यायालयाने (Igatpuri Court) ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील याबाबत खुलास करताना डॉ. वाजे यांच्या मारेकऱ्याचे नाव सांगितले होते. अत्यंत शांत डाेक्याने आणि पूर्वनियोजित कट रचून डॉ. वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह गाडी जाळून टाकली होती. याबाबत सविस्तर चौकशी आणि डीएनए अहवाल यावरून पती संदीप वाजे याला अटक करण्यात आली होती.
[read_also content=”मुंबईत ट्रॅफिकमुळे ३ टक्के घटस्फोट होतात हा जावईशोध अमृता फडणवीसांनी कुठून लावला ? महापौर किशोरी पेडणेकरांचा सवाल https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mumbai-mayor-kishori-pednekar-reply-on-amruta-fadnavis-statement-about-divorce-due-to-traffic-nrsr-232709.html”]
गुन्हा कसा घडला याबाबत अधिक माहिती व पुरावे गोळा करण्यासाठी वाजेला पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची विनंती न्यायालयात केली होती. न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून जयदेव रिखे यांनी काम बघितले.