Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डांबरी लेअरअभावी रस्ता बनला मृत्यूचा सापळा; मखमलाबाद शिव ते यशवंतनगर मार्गावर अपघातांची मालिका सुरूच

नाशिकमधील गिरणारे महामार्ग क्रमांक २६ वरील मखमलाबाद शिव ते यशवंतनगरदरम्यान रस्त्यावरील डांबरी थर काढल्याने मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. खडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, महिनाभरात चार जणांचा बळी गेल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 05:01 PM
_nashik-girnare-highway-road-accidents-makhmalabad-yashwantnagar four people died

_nashik-girnare-highway-road-accidents-makhmalabad-yashwantnagar four people died

Follow Us
Follow Us:
  • गिरणारे महामार्ग क्रमांक २६ वर प्रचंड अपघात
  • डांबर नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले
  • महिन्याभरात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik Road Accident : मातोरी :
गिरणारे महामार्ग क्रमांक २६ वरील मखमलाबाद शिव ते यशवंतनगरदरम्यान रस्त्यावरील डांबरी थर मशीनच्या साहाय्याने काढण्यात आल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खडबडीत पृष्ठभाग निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. परिणामी, या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, महिनाभरात चार जणांचा बळी गेल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सतत होणाऱ्या अपघातांमुळे ठेकेदाराच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गिरणारे महामार्ग क्रमांक २६ च्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महानगरपालिका हद्दीत रस्त्याचे खोदकाम सुरू असून, त्यानुसार वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र, महानगरपालिका हद्दीबाहेरील कामासाठी स्वतंत्र ठेकेदार असल्याने या भागात रस्त्याचे खोदकाम न करता केवळ मशीनच्या साहाय्याने डांबरी थर काढण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर खडबडीत रेघा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

Nashik News : ‘स्वीकृत’ची अस्वीकृती शहराध्यक्षांच्या मुळावर! नाशिकमधील अंतर्गत राजकारणाची जोरदार चर्चा

बिकट रस्ते अन् भरधाव पिकअपमुळे अपघातसत्र सुरू

एकीकडे रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, तर दुसरीकडे या मार्गावरून धावणाऱ्या पिकअप वाहनांचा वेगही चिंतेचा विषय बनला आहे. मागील आठवड्यात मुंगसरे फाटा येथे यशवंतनगर येथील दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करीत असताना भरधाव पिकअप वाहनाने त्यांना धडक दिली.

या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच शुक्रवारी मखमलाबाद येथील शक्ती गवळी हा युवक दुचाकीवरून गिरणारेच्या दिशेने जात असताना हॉटेल शिवारसमोर भरधाव पिकअपने त्याला धडक दिली. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Political News : अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे झाले एकमत! सुप्रिया सुळेंच्या ‘या’ मुद्द्याला सुनील तटकरेंनी दिला पाठिंबा

तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी

ने या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्यावर डांबरीकरण करावे. तोपर्यंत वाहतूक सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच पोलिसांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष लक्ष देऊन भरधाव वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरिक दत्तूनाना पिंगळे, अक्षय कातड, भिका सूर्यवंशी, प्रदीप पिंगळे, सुदर्शन पिंगळे, मोतीराम पिंगळे आणि शंकर तिदमे यांनी केली आहे.

Web Title: Nashik girnare highway road accidents makhmalabad yashwantnagar four people died nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Nashik Murder
  • Nashik News
  • Road Accident

संबंधित बातम्या

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
1

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष
2

Nashik News : अध्यक्षपदावरून संत निवृत्तीनाथ संस्थानात वाद; धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे वारकऱ्यांचे लक्ष

शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय
3

शालार्थ आयडी घोटाळ्यात तब्बल 1200 संशयित आरोपी; 160 कोटींच्या व्यवहाराचा संशय

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
4

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.