Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा; निवडणुकीत दोन्ही पक्षांत बंडखोरी, नाराजीनाटय रोखण्याचे नेत्यांपुढे आव्हान

Maharashtra Politics News : नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीने सर्वच जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरु केली असून महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 30, 2025 | 12:06 PM
मालेगावी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा

मालेगावी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • बंडखोरी रोखण्यासाठी जागा वाटपाचा फॉम्र्म्युला
  • शिवसेना व भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी
  • महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत
मालेगाव : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असतांना भाजप व शिवसेना (शिंदे गटाची) युती निश्चित झाली आहे. केवळ युतीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. बंडखोरी रोखण्यासाठी जागा वाटपाचा फॉम्र्म्युलाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. दरम्यान, या युतीमुळे शिवसेना व भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी व नाराजीनाट्य रंगले आहे. नाराजीनाट्य रोखण्याचे आव्हान शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांपुढे आहे. तर महाविकास आघाडीने देखील सर्वच जागांवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. परिणामी, शहराच्या पश्चिम भागात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार असून, पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट व एमआयएम, काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

महापालिकेच्या २१ प्रभागातून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट व भाजपच्या युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. गेल्या वीस वर्षांत शहराच्या पश्चिम भागात शिवसेना व भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली आहे.

Pune Municipal Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिवसेना युती फिस्कटली; शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढणार

शहराच्या पूर्व भागात होणार तिरंगी लढत

महाविकास आघाडीसोबत काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या उमेदवारांचा फॉर्मुला निश्चित झाला आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागात तिरंगी लढत होणार आहे. या राजकीय घडामोडीमुळे महापालिकेचे राजकारण ढवळून निघाले आहे.

शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत कमालीची गुप्तता

यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावरून युती करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. शहराच्या पश्चिम भागातील हिंदू बहुल भागातून २१ नगरसेवक निवडून जातात. या निवडणुकीत शिवसेना व भाजपमध्ये जागावाटपाचा फॉर्मुला कसा झाला याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. दरम्यान, या युतीमुळे भाजपमधील नेते व शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे राजकीय विरोधक बंडूकाका बच्छाव यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मनपा निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे भूमिका घेतली आहे. भाजप उमेदवारांना बाहेरून पाठिंबा देईल मात्र प्रचारसभा व प्रचारात प्रत्यक्ष सहभागी
होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तर युवा नेते अद्वय हिरे यांनी देखील युतीचा निर्णय झाल्यानंतर नाराजी दर्शवत मालेगाव मनपाच्या निवडणुकीतून काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे. हिरे सोमवारी (दि.२९) नाशिक येथे त्यांच्या भावजाई योगिता हिरे यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

माजी गटनेते सुनील गायकवाड यांची राजकीय कोंडी

मंत्री भुसे यांचे विरोधक व भाजपचे नेते डॉ. तुषार शेवाळे यानी सावध भूमिका घेतली आहे. गेल्या वीस वर्षाच्या निवडणुकीत शिवसेनेशी टक्कर दिलेले भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणारे माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्याकडे असणाऱ्या इच्छुकांची संख्या बधता गायकवाड यांची राजकीय कोंडी झाली आहे, गायकवाड यांनी स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, भाजपच्या उमेदवारांसाठी काम करू अशीही भूमिका त्यानी घेतली आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिका-यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणुकीचा निकाल उलटसुलट लागला तर स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या वरिष्ठांना सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

या राजकीय घडामोडीमुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये अंतर्गत मतभेद व गटबाजी दिसून येत आहे. तर शिवसेनेतही नाराजीनाट्य रंगले आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे अखेरच्या दिवशी कोणाला उमेदवारी देतात याकडे शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकत्यांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेतही मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेनेपुढे बंडखोरी रोखण्याची मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मंगळवारनंतर माधारीच्या दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. शहराव्या पूर्व भागात एमआयएम व काँग्रेसच्या युतीची चर्चा आता थांबली आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी एमआयएमसोबत युती न करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस व एमआयएम स्वतंत्र लढणार आहे.

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर

Web Title: Malegaon discussion of an alliance between bjp and shiv sena during elections news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • Malegaon
  • Nashik

संबंधित बातम्या

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान
1

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा
2

Maharashtra Politics: मोठी बातमी! “भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय…”, शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट, ‘या’ नेत्याने केली घोषणा

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र
3

‘गेल्या 60 वर्षांत शिवसेनेने कधीही सौदेबाजी केली नाही, पण शिंदेंनी…’; संजय राऊत यांचे टीकास्त्र

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच
4

विदर्भात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार; जागावाटपावर चर्चांमधून तोडगा नाहीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.