Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : पारा ४१.४ अंशावर…! हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद, नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना

मालेगाव येथे तापमान ४१.४ अंशांवर पोहोचत हंगामातील उच्चांक नोंदवला गेला, तर नाशिक येथे ३९.५ अंश तापमान नोंदले गेले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 13, 2026 | 11:40 AM
पुण्यात वाढतोय उष्माघाताचा तडाखा; कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन

पुण्यात वाढतोय उष्माघाताचा तडाखा; कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन

Follow Us
Follow Us:
  • हंगमातील उच्चांकी तापमानाची नोंद
  • नाशिक @ ३९.५; सतर्कतेच्या सूचना
  • उष्णतेची तीन लाट पाहता जिल्हा देखील अलर्ट मोडवर
नाशिक: सूर्य कमालीचा तळपल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असून रविवार (दि.१२) रोजी कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. या हंगामातील सर्वाधिक उच्चांक नोंदविला गेला. उष्णतेची तीन लाट पाहता जिल्हा देखील अलर्ट मोडवर आले आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून शासकीय विभागांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. परंतु, ११ मार्चपासून शहरात उन्हाच्या तीव्रतेत अचानक वाढ झाली आहे. सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्णा जाणवत आहे. त्यामुळे दिवसा उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर रात्रीच्या वेळी पडणाऱ्या उकड्याने नागरिक हैराण झाले आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्रता आणखीनच वाढत असल्याने रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. उष्णतेची लाट पाहता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. आरोग्यविषयक गंभीर समस्या लक्षात घेता प्रशासनाने महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, परिवहन, कामगार, महिला व बालविकास, पशुधन औद्योगिक विकास महामंडळासाठी मार्गदर्शक सूचना जरी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nashik News: खबरदार! पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास होणार पाच पट दंड, पाणीटंचाईची स्थायीच्या सभेत नगरसेवकांची तक्रार

कसमादेत उन्हाचा तडाखा

यंदा एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यातच तपमानाचा पारा ४१.४ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य व सूर्याच्या प्रकोपाने कायम राहील असे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत असतो मात्र यंदा एप्रिलमध्ये सूर्यदेव कोपला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात ४१ अंश पर्यंत सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. राज्यात अवकाळी पावसानंतर उष्णतेची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून कसमादेत उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा दिवसागणिक वाढू लागला आहे सध्या ४१ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले.

किमान तापमानातही वाढ

किमान तापमान देखील वाढू लागले आहे. मागील तीन दिवसात किमान तापमानामध्ये ४ अंशांची वाढ झाली असून रविवारी २०.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. यामुळे रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत असल्याने घरात बसने देखील कठीण होत आहे. तसेच उकाड्याने मोठी अस्वस्थता जाणवत आहे.

Nashik News: शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा! ७४२ रुपये प्रीमियम भरला अन् विम्याच्या नावाखाली मिळाले अवघे १८३ रुपये

Web Title: Malegaon record 41 temperature nashik 39 heat alert news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • heat wave
  • Nashik

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
1

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Nashik News: सुटे तेल विक्री बंदीमुळे व्यापारी अडचणीत; महिन्यातून दोनदा नमुने घ्या, पण बंदी उठवा
3

Nashik News: सुटे तेल विक्री बंदीमुळे व्यापारी अडचणीत; महिन्यातून दोनदा नमुने घ्या, पण बंदी उठवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.