
EVM वर धनुष्याचं बटण दाबलं, कमळाची लाईट लागली; नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ
Nashik Election 2026 News: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या व आठ वर्षांनी होत असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या १२२ जागांसाठी आज गुरूवारी (१५ जानेवारी 2026) मतदान होत असून, शहरातील सुमारे १३,६०,७२२ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी स्वबळ अजमावित असून, निवडणूकीच्या सेना-मनसे एकत्र येवून त्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. या शिवाय महायुतीतील शिंदे सेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली असून, माकप, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी काही जागांवर निवडणूक लढवित आहेत.
सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपाने स्वबळावर सत्ता हस्तगत केली होती. पाच वर्षे मनपाचा कारभार पाहिल्यानंतर मनपाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली. मात्र या निवडणुकीदरम्यान नाशिक शहरातील काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २४ मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमबाबत गंभीर आरोप झाल्याने सरकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांकडून असा दावा करण्यात आला आहे की, धनुष्यबाण या चिन्हासमोर बटण दाबल्यानंतर मशीनवर भाजपच्या चिन्हाचा लाईट लागत असल्याचे मतदारांच्या निदर्शनास आले.
प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र असेच सांगितले जात आहे. काही मतदारांनी थेट मतदानादरम्यान संशयास्पद अनियमितता झाल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. ईव्हीएमच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला असता.
दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार शिंदे गटांनी अधिक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की ईव्हीएमबद्दल तक्रार मतदारांना धमकावले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढली होती आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
मनपा निवडणूकीसाठी प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून, १५६३ मतदान केंद्रासाठी ८८०० कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या निवडणूकीसाठी ४८६० बैलेट युनिट्स व १८०० कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले असून, मतदानाच्या वेळी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी राखीव बँग्रेट व कंट्रोल युनिट तयार ठेवण्यात आले आहे. तीन प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी अशा प्रकारे दहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येवून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले.