नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२२
नाशिक जिल्ह्यातील नाशिक महानगरपालिकेत ४४ प्रभाग असून सदस्य संख्या १२२ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ६६ नगरसेवक निवडून आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. या पालिकेवर भाजपाकडून पहिले अडीच वर्षे रंजना भानसी तर दुसरी अडीच वर्षे सतीश कुलकर्णी यांनी महापौरपद भूषवले. त्यानंतर मुदत संपल्यामुळे पालिकेचा कारभार प्रशासकामार्फत सुरू आहे.






