Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

Nashik Case: "पती दोन महिन्यांत मरेल..." प्रेमात पडलेल्या उच्चशिक्षित तरुणीचा संसार मोडण्यासाठी रचला गेला काळाकुट्ट कट! भोंदूबाबाच्या अघोरी प्रकाराने उडाली खळबळ... पाहा नाशिकमधील संतापजनक बातमी!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 15, 2026 | 03:16 PM
Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? "पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने "प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? "पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने "प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

Follow Us
Follow Us:
  • भोंदूबाबाने उच्चशिक्षित तरुणीचा प्रेमविवाह मोडण्याचा  केला प्रयत्न
  • ‘पती दोन महिन्यांत मरेल’ अशी भीती दाखवून भोंदूबाबाने अघोरी केले कृत्य
  • अंनिसच्या मागणीनुसार भोंदूबाबावर जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
Nashik Case: मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक खरात नावाच्या भोंदूने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच, आता नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमधून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथं एका भोंदूबाबाने प्रेमविवाह केलेल्या तरुणीला भीती दाखवून तिचा संसार आणि लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्रमक होत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: Pandharpur: “अचानक विहीर कोसळली अन्…” पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या खोदकामादरम्यान भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली चारजण…

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने स्वतःच्या पसंतीने ३१ ऑक्टोबर रोजी प्रेमविवाह केला होता. मात्र, हा विवाह मान्य नसलेल्या तिच्या माहेरच्या नातेवाईकांना हा प्रकार कोणत्याही हालतीत मोडायचा होता. यासाठी त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या तरुणीला सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील एका भोंदूबाबाच्या दरबारात बळच नेले.

‘पती दोन महिन्यांत मरेल’ भोंदूबाबाची धमकी

पंचाळे येथील त्या भोंदूबाबाने तरुणीला आपल्या जाळ्यात घेत अंधश्रद्धेच्या आधारे प्रचंड भीती निर्माण केली. त्याने तरुणीला धमकावत सांगितले की, “जर तू या विवाहात आणि पतीसोबत राहिलीस, तर तुझा पती पुढील दोन महिन्यांत नक्की मरेल.” या भीतीपोटी तिच्या मनात घात घालण्यासाठी आणि संसारात फूट पाडण्यासाठी भोंदूबाबाने तिला लिंबू आणि दोरा बांधल्याचेही समोर आले आहे. उच्चशिक्षित तरुणीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

अंनिसकडून कठोर कारवाईची मागणी

अशा प्रकारे भोंदूबाबाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवून व भीती घालून तरुण-तरुणींचे संसार मोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि समाजाला अंधकारात ढकलणाऱ्या या भोंदूबाबावर तात्काळ ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा धक्कादायक प्रकार नाशिकमधील कोणत्या परिसरात घडला?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे हा प्रकार घडला आहे.

  • Que: भोंदूबाबाने तरुणीला काय धमकी दिली?

    Ans: "जर तू या विवाहात आणि पतीसोबत राहिलीस, तर तुझा पती पुढील दोन महिन्यांत नक्की मरेल," अशी अंधश्रद्धेची भीती भोंदूबाबाने तरुणीला घातली.

  • Que: या प्रकरणी कोणत्या संस्थेने कारवाईची मागणी केली आहे?

    Ans: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणाची गंभीर दखल घेत भोंदूबाबावर जादूटोणा कायद्यान्वये कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: Nashik sinnor panchale bhondu baba love marriage case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Crime in Nashik
  • Love Marriage
  • Nashik Latest News

संबंधित बातम्या

Kavya Maran : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात; ग्रीसमधील ड्रीमी वेडिंगचे फोटो व्हायरल
1

Kavya Maran : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात; ग्रीसमधील ड्रीमी वेडिंगचे फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.