सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावात निवास शिंदे नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. जवळपास ३० फुटांची विहीर खोदण्यात येत असताना अचानक विहिरीतील दगड व मातीचा मोठा ढिगारा तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळला. हा अपघात इतका अचानक घडला की कामगारांना स्वतःचा बचाव करण्याची किंवा बाहेर पडण्याची मुळीच संधी मिळाली नाही. हे सर्व कामगार सध्या दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील दगड-मातीचा ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बचावकार्यास वेग देण्यासाठी लवकरच एनडीआरएफची (NDRF) टीम देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत नेमके किती कामगार अडकले आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याबाबतची कोणतीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Ans: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात निवास शिंदे यांच्या शेतात ३० फूट खोल विहीर खोदण्याचे काम सुरू असताना विहीर कोसळून हा अपघात झाला.
Ans: विहीर खोदताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने चारजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: प्रशासनाकडून जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवला जात असून, मदतकार्यासाठी लवकरच एनडीआरएफची टीम दाखल होणार आहे.






