Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik: ‘कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत’, मंत्री नितेश राणे यांचा इशारा; तर विरोधकांवर टीकास्त्र

मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 07, 2025 | 03:32 PM
'कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत', मंत्री नितेश राणे यांचा इशारा (Photo Credit - X)

'कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत', मंत्री नितेश राणे यांचा इशारा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • नितेश राणे नाशिक दोऱ्यावर
  • ‘कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत
  • विरोधकांवर जोरदार टीकास्त्र

नाशिक: “कुंभमेळ्यात केवळ हिंदूंचीच दुकाने लागली पाहिजेत, ही मागणी नव्हे तर हे झालेच पाहिजे. मशिदीबाहेर आम्ही दुकान लावतो का? मग यांनी कुंभमेळ्याच्या ठिकाणी आपली दुकाने का लावावीत? ज्यांना आमचे नियम मान्य नसतील, त्यांनी येथून चालते व्हावे,” असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला. मंत्री राणे गुरुवारी (दि. ६) नाशिक दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधत होते.

बोगस मतदानाचा मुद्दा आणि विरोधकांवर टीका

विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा निवडणुकीत १४ वेळा बुरखा घालून मतदान झाले, तेव्हा का विचारले नाही? “बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला होत्या का, हा प्रश्न कुणी विचारला का? मोहम्मद अली रोडवर किती बोगस मतदार आहेत, त्याबद्दल का बोलले जात नाही? दोन्ही बंधूंनी त्यावेळी या विषयावर का काही विचारले नाही?” असेही ते म्हणाले.

‘हिरवे साप’ आणि हिंदू कीर्तनकारांकडे लक्ष

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवरील टीकेबाबत बोलताना राणे म्हणाले की, “आमच्या कीर्तनकारांवर वारंवार टीका केली जाऊ नये. केवळ हिंदू कीर्तनकारांकडे लक्ष देण्याऐवजी इतर धर्मामध्ये देखील मोठे कार्यक्रम आणि विवाह सोहळे होत असतात.” “आपल्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक देशभक्त असला पाहिजे. मुस्लीम देशभक्तांबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही; पण जिहादी विचारांचे ‘हिरवे साप’ आहेत, त्यांच्यावर आमचा आक्षेप आहे.” मौलाना डुप्लिकेट विषय असतो, कारण ते पूर्वी हिंदूच होते, असा उल्लेख त्यांनी केला.

हे देखील वाचा: नाशिक जिल्हा बँकेवर मोठी थकबाकी; जिल्हा बँकेची नवीन इमारत आता लवकरच लिलावात

पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर बगल

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी “मला याबाबत काहीही माहिती नाही,” असे उत्तर दिले. “या संदर्भात भाजप नेते निर्णय घेतील,” असे म्हणून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. जमीन घोटाळ्याबाबत पुन्हा विचारले असता राणे म्हणाले की, “आमचे मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करतील.”

खात्याचा आढावा

मत्स्य उत्पादन आणि व्यवसाय कसा सुरू आहे, तसेच कृषी दर्जा मिळाल्यानंतर विभागाचे कामकाज कसे सुरू आहे, याचा मी जिल्हानिहाय आढावा घेत आहे. त्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. सिंधुदुर्ग युतीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “त्या विषयावर मी तिथेच जाऊन उत्तर देईन. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा: Nashik News: द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात! दीड लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा कुजल्या; बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे अथक प्रयत्न

Web Title: Only hindu shops should be opened at kumbh mela warns minister nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Kumbh Mela
  • Nashik
  • Nitesh Rane
  • voting news

संबंधित बातम्या

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा! मंत्री नितेश राणे यांच्या सूचना
1

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा! मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

Bihar Election Voting Day 2025: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान; 121 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद
2

Bihar Election Voting Day 2025: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान; 121 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!
3

Cabinet Meeting: मुंबई-नाशिक-पुण्यासाठी पायाभूत सुविधांचा ‘मेगा प्लॅन’; उत्तन-विरार सागरी सेतू आता वाढवण बंदरापर्यंत!

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट
4

Palghar : डहाणूतील ‘त्या’कुटुंबांची नितेश राणेंनी घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.