'...तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देणार'; चौफेर टीकेनंतर माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान
Manikrao Kokate News: मागील आठवडाभरात महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या कांदा, आंबा, भुईमूग यांसारख्या महत्त्वाच्या पिकांना फटका बसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. मात्र, नुकतीच नाशिक जिल्ह्यातील पाहणीदरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वादग्रस्त विधान – “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” – यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कोकाटे यांचे हे विधान शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणारे असल्याचे मत विरोधकांकडून मांडले जात असून, यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही कोकाटे यांनी शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणणे, तसेच कर्जमाफीची रक्कम ‘लग्नात खर्च केली जाते’ असे म्हणत वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातून त्यांच्यावर रोष वाढला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय उपयोग? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य त्यांनी केले.
Breaking: पाकिस्तानमध्ये पुन्हा भूकंप! झटक्यामुळे लोकांमध्ये पसरली दहशत
कोकाटे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांना तातडीने मदतीची आवश्यकता आहे. मात्र, कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
RCB Vs PBKS : ‘ही तर आत्महत्या…’, Sunil Gavaskar यांनी श्रेयस अय्यरला चांगलच सुनावलं, वाचा सविस्तर
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षे, आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पत्रकारांनी विचारले असता, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर उभ्या पिकांचे पंचनामे केले जात असल्याचे पत्रकारांनी विचारताच, माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार आहे, ढेकलांचे पंचनामे करायचे का, जे कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील, जे घरात आणून ठेवलेत त्यांचे पंचनामे होणार नाहीत, त्यांचे पंचनामे नियमात बसणार नाहीत. असही त्यांनी सांगितलं. तसेच जी पिके शेतात असतील त्यांचेच रीतसर पंचनामे होतील, असही त्यांनी स्पष्ट केलं.