सुनील गावस्कर आणि श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये असे काही घडले आहे, असा कुणी विचार देखील केला नसावा. पंजाब किंग्ज हा संघ आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी करता आला आहे. परंतु आरसीबीविरुद्ध पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १०१ धावांवर कोसळला. अशा कामगिरीचा कोणी विचारही केला नसेल. संपूर्ण संघ फक्त १०१ धावांवर माघारी परतला. तोही अतिशय महत्त्वाच्या सामन्यात. हे पाहून सुनील गावस्कर यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी असे काही विधान केले ज्यामुळे क्रीडा जगतात गोंधळ निर्माण झाला आहे.
श्रेयस अय्यर आणि पंजाब संघाची फलंदाजी आरसीबीविरुद्ध पूर्णपणे ढेपाळली होती. हे पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कर्णधार आणि पंजाब संघावर देखील टीकेचे आसूड उगारले. गावस्कर यांनी पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी जे शॉट सिलेक्शन केले आहे, त्यावर टीका केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी कॉमेंट्री दरम्यान म्हटले की, “हे आत्महत्या करण्यासारखे आहे.”
सुनील गावस्कर यांनी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील फटकारले आहे. चौथ्या षटकात २ धावा काढून माघारी परतला तेव्हा तो डावातील तिसरा बळी ठरला होता. त्याला जोश हेझलवूडने विकेटच्या मागे झेलबाद होण्यास भाग पाडले. गावस्कर कर्णधार अय्यरबद्दल म्हणाले की, “ही चांगली शॉट निवड नाही.”
तसेच टे पुढे म्हणाले की, “जर तुम्ही लाँग ऑफवर मारण्याचा प्रयत्न करत असाल तर समजू शकते. पण हा एक स्विंग आहे. २ विकेट पडल्या आहेत आणि चौथा षटक अजूनही सुरू आहे.” गावस्करच्या या विधानामुळे क्रीडा वर्तुळात गोंधळ निर्माण झाला.
गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. ज्यामध्ये पंजाबला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोरदार कामगिरी केली आणि पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाब संघ १०१ धावांवर गारद झाला. प्रत्युउत्तरात आरसीबीने सलामीवीर फील सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरवार आरसीबीने ११ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला.
पंजाबला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. त्यांचा सामना १ जून रोजी अहमदाबादमध्ये क्वालिफायर-२ मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल.