Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई

अवैध नायलॉन मांजा साठवणूक किंवा विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या इसमांवरही कोणतीही तडजोड न करता गुन्हा दाखल केला जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 12, 2026 | 04:16 PM
नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई

नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई

Follow Us
Close
Follow Us:
  • अवैध नायलॉन मांजाची विक्री
  • दोन स्वतंत्र पथके तैनात
  • सिन्नरमध्ये १४ रिळ जप्त; ११,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सिन्नर : पतंगोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सिन्नर शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यासाठी सिन्नर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांना होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शहरात दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत.

पहिले पथक उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, गणेश वराडे, कृष्ण कोकाटे आणि प्रशांत सहाणे यांचा समावेश आहे. दुसरे पथक उपनिरीक्षक दादा गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असून, पोलीस हवालदार हरीश आव्हाड, भारत पवार, रवींद्र चीने आणि प्रमोद साळवे हे कर्मचारी या पथकात आहेत. या पथकांनी सिन्नर शहरातील वावीवेस, शिवाजीनगर, सरदवाडी रोड, देवी रोड, बाजारपेठ परिसरातील पतंग विक्रेत्यांची दुकाने तपासली. तपासणीदरम्यान अवैध नायलॉन मांजा साठवणूक किंवा विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम

तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवणाऱ्या इसमांवरही कोणतीही तडजोड न करता गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. विशेष म्हणजे नायलॉन मांजाचा वापर करणारा अल्पवयीन आढळल्यास संबंधित पालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील गल्लोगल्ली, वसाहती, छतांवर तसेच मोकळ्या मैदानात पोलिसांची कडक नजर राहणार असून, संक्रांतीच्या दिवशीसुद्धा विशेष पथके तैनात राहून कारवाई करणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नायलॉन मांजाच्या बाबतीत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कागदी अथवा सुती मांजाच वापरावा आणि अवैध नायलॉन मांजाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सिन्नर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सिन्नरमध्ये १४ रिळ जप्त; ११,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नर पोलिसांनी अवैध नायलॉन तरुणावर गुप्त बातमीच्या आधारे शनिवारी (दि. १०) धडक कारवाई कैली. या कारवाईत शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या मार्ग राहणारा ओंकार नितीन खत्री यास ताब्यात घेत ११, २०० रुपये किमतीचे १४ नायलॉन मांजाचे रिक जप्त करण्यात आले, संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भामरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, संदीप शिंदे तसेच शोचपथकातील नितीन डावखर, आप्पासाहेब काकड, समाधान बोराडे यांनी तत्काळ छापा टाकला. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल इंगोले करीत आहेत, ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या सूचनांनुसार सिन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली, पोलिसांनी नागरिकाना आवाहन केले आहे की, अवैध नायलॉन मांजाविषयी कोणालाही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखाली जाईल.

येवल्यात नायलॉन मांजाचे १०४ रीळ जप्त

येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपदार वस्ती परिसरात धाड टाकून नायलॉन मांजाचे सुमारे ५२ हजार रुपयांचे १०४ रीळ जप्त केले आहेत. याप्रकरणी येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजहर सलीम चोपदार यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून विशेष पथकासह छापा टाकला. आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आणखी कोणी व्यक्ती विक्री किंवा साठवणुकीत सामील आहे का, याचा तपास सुरू आहे. नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली. नागरिकांनी अशा बेकायदेशीर विक्रेत्यांची माहिती देण्याचे आवाहनही येवला शहर पोलिसांनी केले आहे.

+

Web Title: Sinnar launches a strict campaign against nylon rags police deploy two special teams direct action against sellers and users as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Nylon Manja

संबंधित बातम्या

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका
1

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
2

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

सुपर संडे ठरला ‘हाय व्होल्टेज’, पुण्यात जोरदार प्रचार; उद्या प्रचाराची अधिकृत सांगता
3

सुपर संडे ठरला ‘हाय व्होल्टेज’, पुण्यात जोरदार प्रचार; उद्या प्रचाराची अधिकृत सांगता

Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण?
4

Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.