मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम (फोटो सौजन्य-X)
बैठकीस मनपाचे जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, अधिक्षक निलेश पाटील, जनसंपर्क व नगरसचिव विभागाचे कर्मचारी गौरव पवार, सचिन पिंगळे, उदय आहिरे, आप्पासाहेब आहिरे, कापड व्यापारी राजेश दत्तानी, ललीत शर्मा, संतोष पाटील, पियुष शर्मा, किशोर सोनवणे, प्रसन्न सुराणा, गौरव कासार, महेश गोपलानी, आयुष अग्रवाल, सतिश पिंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनजे यांनी निर्भय, निष्पक्ष व शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला, कापड व्यापारी असोसिएशनतर्फे लोकशाही मूल्य जपण्यासाठी अशा प्रकाराचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले, तसेच येत्या १५ जानेवारी, २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करुन येणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलत योजना सर्व व्यापायांमार्फत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, व्यापारी संघटनेने घेतलेल्या या निर्णयानंतर मतदार घराबाहेर पडतील आणि निर्भय, निष्धक्षपणे मतदान करून मालेगाव शहराच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत देतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. या उपक्रमाबरोबरच अजून काही उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्याचा मानसही यावेळी संघटनेच्या पदाधिका-यानी बोलून दाखवला.






