
पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या २ जवानांना अटक
नाशिक : पंजाब पोलिसांनी नाशिकमधील देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये तैनात दोन जवानांना अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून पंजाब पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या मूळ गावी पतियाळा येथे असताना अटक करण्यात आली. हे दोघेही तोफखाना केंद्रात असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती आणि लष्करी छावण्यांचे नकाशे व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला पाठवत असत.
हेदेखील वाचा : ‘तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल’; तालिबानला संपुष्टात आणण्यासाठी ISI चे मोठे पाऊल
आरोपी संदीपसिंग 2015 मध्ये सैन्यात भरती झाला होता. पतियाळामधील सरदुलगड येथील रहिवासी संदीपसिंग त्याच्या साथीदारांसह देशातील अनेक लष्करी छावण्यांबद्दल माहिती गोळा करुन ती व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पाठवत होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त करुन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, गेल्या दोन वर्षांत संदीपसिंगने नाशिक, जम्मू, पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांचे फोटो, शस्त्रास्त्रांची माहिती आणि अधिकाऱ्यांच्या तैनातीची माहिती आयएसआयला पाठवली होती.
दरम्यान, पोलिसांनी नाशिक कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल अमृतपालसिंगलाही अटक केली. फिरोजपूरमधील एका निर्जनठिकाणी अमृतपालसिंगला दोन लाख रुपये देण्यात आले. हेरॉईनसारखे पदार्थ त्याच्या ताब्यात सापडल्याने हे दोघेही ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचा संशय होता. यानंतर, लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि नाशिकमधील त्याच्या सहकाऱ्यांची आणि त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरू केली.
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात तणाव
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावाला नवे वळण लागले आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर काबूलने पाकिस्तानला आपल्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रात हेरगिरी करत आहे.
हेदेखील वाचा : आता ‘या’ देशानेही केली अमेरिकेसोबत युद्धाची तयारी; ट्रम्प यांच्या विरुद्ध बोलावली अरब देशांची आणीबाणी शिखर परिषद