Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : विधवा महिलांच्या आयुष्यात नवी पहाट; जुनी बंधनं झुगारत केली रंगांची उधळण

पतीच्या निधनानंतर समाजाच्या चौकटीत अडकून, स्वतःच्या आयुष्यातील आनंदाचे सर्व रंग हरवून बसलेल्या विधवा महिलांच्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्याचे रंग भरण्याचा एक अत्यंत क्रांतिकारी प्रयत्न नाशिक जिल्हा परिषदेने केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 08, 2026 | 02:31 PM
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आयुष्यात आशेचा किरण पेरण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न
  • पुरुष अधिकाऱ्यांचाही सहभाग
  • जुन्या प्रथांचे जोखड झुगारली
Nashik News : पतीच्या निधनानंतर समाजाच्या चौकटीत अडकून, स्वतःच्या आयुष्यातील आनंदाचे सर्व रंग हरवून बसलेल्या विधवा महिलांच्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्याचे रंग भरण्याचा एक अत्यंत संवेदनशील आणि क्रांतिकारी प्रयत्न नाशिक जिल्हा परिषदेने केला आहे. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्याने केवळ या महिलांच्या आयुष्यातच नव्हे, तर सामाजिक मानसिकतेतही एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…

आयुष्यात आशेचा किरण पेरण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

ग्रामीण भागात पतीच्या निधनानंतर महिलांना आजही अनेक सामाजिक बंधने, अंधश्रद्धा आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली जगावे लागते. या ‘एकल’ महिलांचे आयुष्य एकाकीपणाच्या कोंदणात अडकलेले असते. या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्हा परिषदेच्या ‘एकल महिला’ मोहिमेद्वारे गावागावात अशा महिलांची माहिती गोळा करण्यात आली. यापूर्वी त्यांच्यासाठी पुनर्विवाहासारखे धाडसी सोहळे यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर, आता रंगपंचमीच्या निमित्ताने त्यांना आनंदाच्या रंगांत न्हाऊ घालण्याचा हा अनोखा प्रयोग करण्यात आला.

पुरुष अधिकाऱ्यांचाही सहभाग

हा कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकाराने आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात कोणतीही कृत्रिम रंगबाजी नव्हती, तर पूर्णपणे नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता. हिरवा, निळा, पिवळा, लाल आणि गुलाबी रंगांची उधळण करत असताना या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे, केवळ महिला अधिकारीच नव्हे, तर पुरुष अधिकाऱ्यांनीही आपला बडेजावपणा आणि पदाचा रुबाब बाजूला ठेवून या सोहळ्यात मुक्तपणे सहभाग नोंदवला.

जुन्या प्रथांचे जोखड झुगारली

तब्बल तीन तास चाललेल्या या रंगोत्सवात महिलांनी आपल्या मनातील दुःख, समाजाची भीती आणि जुन्या प्रथांचे जोखड पूर्णपणे झुगारून दिले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी सरोज जगताप आणि गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांसारख्या वरिष्ठ महिला अधिकारीही उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमामुळे ‘जीवनात रंगाला वर्ज्य मानणाऱ्या’ महिलांना आपणही आनंदाने जगू शकतो, हा नवा आत्मविश्वास मिळाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेचा हा प्रयोग खऱ्या अर्थाने समाजासाठी एक दिशादर्शक ठरला असून, विधवा महिलांना सन्मानाने आणि उत्साहाने जगण्याची नवी उमेद देणारा ठरला आहे.

River Linking Project: सिन्नरच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात! नदीजोड प्रकल्पासाठी १३,४९७ कोटींची ऐतिहासिक तरतूद

Web Title: Widow women celebrate rangpanchami nashik zp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Nashik News
  • red color

संबंधित बातम्या

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त
1

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी
2

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.