Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नर लोकन्यायालयात ‘न्याय आपल्या दारी’; एकाच दिवसात ३६ हजार प्रकरणांचा निपटारा

लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी दावे, दाखलपूर्व बँक वसुली प्रकरणे, ग्रामपंचायत, महावितरण, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.

  • By anuradha sagar
Updated On: May 11, 2026 | 05:55 PM
ok Adalat, Junnar News, Justice at Doorstep, Pune District Court

ok Adalat, Junnar News, Justice at Doorstep, Pune District Court

Follow Us
Follow Us:
  • एकूण ३६,२३१ प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणांचा तडजोडीने यशस्वी निपटारा
  • तडजोडीच्या माध्यमातून एकूण २ कोटी ९ लाख ६० हजार २५८ रुपयांची वसुली
 

Junnar Lok Adalat : जुन्नर न्यायालयात शनिवारी (९ मे)आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकूण ३६ हजार २३१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला. तसेच प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमधील एकूण २ कोटी ९ लाख ६० हजार २५८ रुपयांची तडजोडीने वसुली करण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या सौजन्याने तसेच तालुका विधी सेवा समिती, जुन्नर यांच्या वतीने आयोजित लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जुन्नर येथील मा. एस. बी. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

Purandar Airport News: पुरंदर विमानतळाचा ‘टेक-ऑफ’ सुसाट! ६३७ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी

यावेळी बोलताना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी, “‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार विधी सेवा प्राधिकरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपली प्रलंबित प्रकरणे निकाली काढून वेळ आणि पैशाची बचत करावी,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लोकन्यायालय पॅनल प्रमुख न्यायाधीश एस. बी. शेलार, चौथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जुन्नर येथील एस. एस. जैन, जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत हडवळे, उपाध्यक्ष निलीमा शेरकर, सचिव पुराणिक नलावडे, लोकअदालत पॅनल सदस्य ॲड. प्रविण मदगुळे, ॲड. श्वेता पवार तसेच समर्थ लॉ कॉलेज, बेल्हे येथील स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

आरोपींना 2 दिवसात अटक करा, नाहीतर…; विकास लवांडे शाईफेक प्रकरणावरुन रोहित पवारांचा इशारा

लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी दावे, दाखलपूर्व बँक वसुली प्रकरणे, ग्रामपंचायत, महावितरण, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या कामकाजात लोकन्यायालयाच्या दोन पॅनलमार्फत दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याद्वारे एकूण ३६ हजार २३१ प्रकरणे आपसी समझोता व तडजोडीने निकाली काढण्यात आली.

राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश एस. बी. शेलार यांच्या न्यायालयात व्हीसीद्वारेही पक्षकार उपस्थित झाले होते. तसेच जुन्नर वकील बार असोसिएशनचे सदस्य, पोलीस अधिकारी व कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, पंचायत समिती जुन्नर, बँका, ग्रामपंचायती, महावितरण, पतसंस्था आणि फायनान्स संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

Web Title: National lok adalat in junnar over 36000 cases resolved in a single day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.