नवी मुंबई : महापालिका आस्थापनेतील कायम, ठोक, रोजंदारी तसेच तासिका तत्वावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला निर्देश देण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची भेट घेत लेखी निवेदनातून केली आहे.
दिवाळी आता अवघ्या महिन्यावर आलेली आहे. वाढत्या महागाईत घरातील दिवाळीचा फराळ, मुलांसाठी कपडे, फटाके व अन्य खरेदी अशा अनेक कारणासाठी बोनस हा त्यांच्या अर्थकारणाला हातभार लावत असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आस्थापनेतील कायम, ठोक, रोजंदारी तसेच तासिका तत्वावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करण्यासाठी आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश द्यावेत. महापालिका प्रशासनाच्या शिक्षण विभागातील तासिका शिक्षकांना रजेचे पैसे देण्यात येत नाहीत. वेतन अत्यल्प असल्याने त्यांना या महागाईच्या काळात हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे तासिका शिक्षकांबाबत मानवतेच्या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासनाने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर तासिका शिक्षकांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. या शिक्षकांना गेल्या वर्षीही सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही. या वर्षी या शिक्षकांना 20 ते 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करुन संबंधितांना दिलासा देणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील ठोक मानधनावरील शिक्षकांना 35 हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील शिक्षकांना 40 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) महापालिका प्रशासनाने जाहीर करून शिक्षकांना दिलासा द्यावा.महापालिका प्रशासनाला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे सातत्याने केंद्र व राज्य स्तरावर सातत्याने पुरस्कार मिळत आहे. महापालिकेचा व शहराचा नावलौकीक वाढत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपये सानुग्रह अनुदान लवकर जाहीर करून या कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील ठोक मानधनावरील शिक्षकांना 35 हजार रुपये आणि कायम आस्थापनेतील शिक्षकांना 40 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करून शिक्षकांना देणे आवश्यक आहे. तसेच परभणी विभागातील कर्मचारी अधिकारी व ठोक मानधन वरील चालक वाहक कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान जाहीर करावा, तसेच तासिका शिक्षक यांना पण या वर्षी सानुग्रह अनुदान जाहीर करावा,दिवाळीला जेमतेम एक महिन्याचाही कालावधी राहीलेला नाही. कर्मचारी-अधिकारी सानुग्रह अनुदाबाबत आशावादी आहे.
संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान जाहिर करण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी पालिका आयुक्त शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी कामगार नेते सावंत यांच्यासमवेत सचिव मंगेश गायकवाड, स्वच्छता अधिकारी, लेखविभागतील अधिकारी, शिक्षक, परिवहन विभागातील कर्मचारी,हे उपस्थित होते.