Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : नवी मुंबईत स्कूल वाहनाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी; रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक

वाशी सेक्टर 9 मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने एका उभ्या गाडीला धडक दिली आहे. या धडकेत वाहन चालक संभाजी गणपत पाटील, यांसह दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्हीही विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 25, 2025 | 04:27 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत स्कूल वाहनाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी; रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक
Follow Us
Follow Us:

सावन वैश्य | नवी मुंबई:- वाशी सेक्टर 9 मध्ये एका स्कूल व्हॅन चालकाने एका उभ्या गाडीला धडक दिली आहे. या धडकेत वाहन चालक संभाजी गणपत पाटील, यांसह दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी दोन्हीही विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल आहे.

वाशीत स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. दुपारी साधारण 1 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान स्कूल व्हॅन चालक याने, सेक्टर नऊ वरील रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत एका विद्यार्थ्याच्या पायाला, तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली. दोनही जखमी विद्यार्थ्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच वाहन चालक देखील यात जखमी झाल्याने त्याला देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक स्कूल व्हॅन मध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली करून, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जातात. मात्र संबंधित प्रशासनाकडून या बेशिस्त वाहन चालकांवर कोणती कारवाई होत नाही. एखादी अप्रिय घटना घडल्यावरच वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का.? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

ST Workers Protest : ऐन दिवाळीत एसटीचं चाक थांबणार! एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या?

वाहन कायद्यानुसार प्रत्येक प्रवाशाने सुरक्षा पट्ट्याचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच या व्हॅनमध्ये परवानगी पेक्षा अधिक क्षमतेने विद्यार्थी बसवले जातात. तसेच शाळेत पोहोचायला उशीर झाल्यावर शाळेतून चालकांना ओरडा खावा लागतो, म्हणून चालक हे वाहन वेगाने चालवतात. त्यामुळे शाळा प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता थोडा उशीर झाला तर त्यांना सवलत द्यावी. वाशी परिसरात विविध संस्थांच्या शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फ वाहन पार्क असल्याने या ठिकाणाहून जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याकडे देखील वाहतूक विभागाने लक्ष घालून काहीतरी उपाययोजना करावी.

Mira Bhayander News : उत्तनचा विकास आराखडा जारी ; नागरिकांसाठी 30 दिवसांची हरकतीची संधी

Web Title: Navi mumbai two students injured in school vehicle accident in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Accident Case
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
1

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला
2

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
3

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल
4

Navi Mumbai News: पुणे पॅटर्नचा धडा! नवी मुंबईत ‘दंडाची वसुली’ कधी होणार बंद? नागरिकांचा थेट सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.