Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये NCMC कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही

'अमृत ज्येष्ठ नागरिकां'ना एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीदरम्यान हाताचे ठसे न उमटणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 01, 2026 | 08:03 AM
सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये एनसीएमसी कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही

सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये एनसीएमसी कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. या प्रवाशांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या संबंधित प्रवाशांनी प्रवासाच्या वेळी एनसीएमसी कार्ड सोबत ठेवावे, तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप करून ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण करण्यात येणार आहे. महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी ११ लाख ७८ हजार ९०० नागरिकांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे.

दरम्यान, ‘अमृत ज्येष्ठ नागरिकां’ना एनसीएमसी कार्डची सक्ती करण्यात काही काळाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या वयोगटातील काही ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीदरम्यान हाताचे ठसे न उमटणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तत्काळ लागू करण्यात आलेली नाही.

कार्डमध्ये पैसे Top-Up करणे आवश्यक

१ सप्टेंबरपासून संबंधित प्रवाशांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येणार असल्याने कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध असणे गरजेचे आहे. प्रवाशांनी कार्डचे Top-up म्हणजेच त्यात रक्कम जमा करून ठेवणे आवश्यक आहे. या प्रक्रियेबाबतची मानक कार्यप्रणाली एसटीच्या संबंधित आगारांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी वेळेत कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सवलतीच्या तिकिटासाठी कार्ड बंधनकारक

विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्यात येते. या प्रवाशांसाठी NCMC कार्डची नोंदणी व वितरण करण्याचे काम महामंडळाने सुरू केले आहे. यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लि. यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

Gondiya News : संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

Web Title: Ncmc card mandatory for concessional tickets on st buses starting today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • NCMC Card

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.