राज्यपरिवहन महामंडळाची एसटी नसल्याच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास धापेवाडा येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी चार लालपरी अडवून मार्गावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून विद्यार्थी आणि पालकांची समजूत घातली. तेसच अधिकाऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेतले. आंदोलनादरम्यान दोन्ही मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. एसटी बससेवा ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाते. कोविड-१९ महामारीनंतर शाळा आता पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी सवलतीच्या पासचा वापर करून धापेवाडामार्गे तिरोडा गोंदिया बससेवेने दररोज शाळेत जाऊ लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गर्दीमुळे बस तिथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही
सध्या तिरोडा ते गोंदियादरम्यान धापेवाडा मार्गे सकाळी ८ आणि ९ वाजता बससेवा चालते. ही बस तिरोडा येथूनच खचाखच भरलेली असते. धापेवाडाला पोहोचेपर्यंत ती पूर्णपणे भरलेली असते. यामुळे धापेवाडा, नवेगाव, निलागोंदी, रत्नारा, हिवरा, कुडवा इत्यादी गावांतील रहिवासी आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये चढता येत नाही. विद्यार्थ्यांना सकाळी गोंदियातील
विद्यार्थ्यांना गैरसोय होत होती. काही पालकांना रोजचा प्रवासखर्च परवडत नव्हता, तर काहींना लिफ्ट मागावी लागत होती. वाहतुकीच्या साधनांअभावी विद्यार्थ्यां कधीकधी शाळा आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नव्हते. महामारीपूर्वीच शिक्षण विस्कळीत झाले होते आणि आता बसच्या कमतरतेमुळे ते शाळा आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचू शकत नव्हते.
लोकप्रतिनिधींनी ‘रापम’ला अतिरिक्त बससेवा सुरू करण्याची विनंती केली, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी थांबा असूनही गोंदिया डेपोतून सुटणारी धापेवाडा-तिरोडा बस कॉलेजजवळ थांबत नाही.
आश्वासनाअंती बसेस केल्या रवाना या मार्गावर पुरेशा बससेवेअभावी, विद्यार्थी वेळेवर शाळा आणि महाविद्यालयात पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येत आहे. गावकऱ्यांच्या महत्त्वाच्या कामातही अडथळा येत आहे. गावामध्ये योग्य बससेवेसाठी वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी रामपच्या अधिकाऱ्यांनी येऊन आपल्या समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन सुरू केले.
जिल्हा परिषद सदस्य विजय उईके, डॉ. प्रदीप रोकडे, कृष्णा ठाकरे, रामेश्वर ठाकरे, अरविंद कात्रे आणि मारुती रहांगडाले घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतर तिरोडा डेपोच्या प्रमुख संजना पटले यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंढरपूर यात्रेमुळे स्थगित करण्यात आलेली मलाजखंडमार्गे गोंदियाला जाणारी बससेवा आता पुन्हा सुरू होईल. अतिरिक्त बसेस चालवण्याचे आश्वासन दिले.






