Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर शरद पवार घेणार दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद

आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दुपारी  3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 06, 2022 | 02:46 PM
महाराष्ट्र-कर्नाटक वादावर शरद पवार घेणार दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात सीमावाद पेटला आहे. तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा (Belgaum, Karwar, Nipani) एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, परिणामी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे.

[read_also content=”…तर मग याच दिवशी दौरा निश्चित केला कसा? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/then-how-come-the-tour-was-fixed-on-this-day-ajit-pawar-question-to-the-state-government-351430.html”]

दरम्यान, आज पुन्हा एकदा सीमावादावरुन वातावरण तापले आहे. आज मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्र-कर्नाटक वादावर दुपारी  3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

सीमाप्रश्नी राज्य सरकार कमी पडत असल्याची टिका होत आहे, त्यामुळं यावर नेमकी काय भूमिका किंवा हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल आदीवर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलणार आहेत. सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधून मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं म्हटल्यावर या दोन मंत्र्यांनी दौरा रद्द केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कन्नडिगांनी महाराष्ट्रातील लोकांवर हल्ला केल्यामुळं वातावरण तापले आहे.

 

Web Title: Ncp chief sharad pwar will hold a press conference afternoon on the maharashtra karnataka issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 02:46 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • karanatak
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
1

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
2

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.