ncp rohini khadse vs cm devendra fadnavis on emergency decision by indira gandhi
मुंबई : देशाच्या माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी आणीबाजी जाहीर केली होती. आजच्या दिवशी आणीबाजी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रामध्ये यावरुन लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. यावरुन आता विरोधकांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
आणीबाणीच्या निर्णयाला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर आता भाजपनेत्यांनी टीका करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्ष झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात.” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, “आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना ? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार?” असे सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले की, “आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते,” अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ?
आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त… pic.twitter.com/uanNJ2u7Gr
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 25, 2025