मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर (Bail Application) सुनावणी होणार असून त्यांना लवकर जामीन मिळू नये म्हणून सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) बातम्या पेरण्याचे काम केले जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ता नबाब मलिक (NCP Spokesperson Nawab Malik) यांनी केला आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरणी वाझे (Sachin Vaze) यांचा मास्टर माईंड परमबीर सिंह (Parambir Singh) असल्याचे समोर आले आहे मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन आय ए) न्यायालयात अतिरिक्त आरोप पत्र दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे असा सवालही मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
[read_also content=”तुमच्या ‘या’ चुकांमुळे केस तुटतात आणि झपाट्याने गळतात, तज्ज्ञांनी सांगितले ते टाळण्यासाठी उपाय; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/common-mistakes-that-can-cause-hair-fall-and-breakage-dermatologist-shares-know-the-details-in-marathi-231567/”]
ते म्हणाले की, ईडी न्यायालया समोर दाखल करण्यात आलेल्या जबाबातील माहिती सक्तवसुली संचालनालयाकडून माध्यमांना पुरवून वातावरण निर्मिती केली जात आहे. या मध्ये राज्यातील अन्य मंत्री आणि मुख्यमंत्र्याचा उल्लेख असल्याचे समोर आणून व्यवस्थेवर दबाव आणायचा प्रयत्न केला जात असून देशमुख यांना जामीन होवू नये म्हणून केंद्रीय यंत्रणाचा वापर केला जात आहे, असे मलिक म्हणाले.
[read_also content=”‘या’ ठिकाणांना भेट देण्यासाठी भारतीयांना केवळ परदेशातच नाही तर भारतातही घ्यावा लागतो व्हिसा https://www.navarashtra.com/lifestyle/travel-tips-to-visit-these-places-indians-need-a-inner-line-permit-also-in-india-nrvb-231323/”]
या संदर्भात त्यांनी वाझे याच्यासह हिरेन हत्या प्रकरणात परमबीर सिंह यांचाही सहभाग असल्याबाबत अतिरिक्त आरोपपत्र एन आय ए का दाखल करत नाही, एंटालिया प्रकरणात सिंह यांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानेच त्यांना राज्य सरकारने आयुक्त पदावरून हटविले. त्यानंतर त्यांनी षढयंत्र करून खोटे आरोप केल्याचे न्यायालयासमोर येणार आहे असे मलिक म्हणाले.