Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्हीही…; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

“पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2025 | 05:22 PM
पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्हीही...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्हीही...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • इंदापुरात राजकीय वातावरण तापलं
  • प्रदीप गारटकर यांचा अजित पवारांना इशारा
  • इंदापुरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अभूतपूर्व राजकीय खळबळ उडाली आहे. “पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्ही सुद्धा टाळल्याशिवाय राहणार नाही!” असा थेट इशारा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे. पुण्यामध्ये बुधवारी (दि. १२) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींमुळे गारटकर समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला असून, “पक्षाने आमचं मत न ऐकलं, तर मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन आणि स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरू!” असा इशारा त्यांनी दिला.

जनतेच्या विश्वासावर राजकारण व्हायला हवं

गारटकर म्हणाले, “मी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा मला ७५ हजार मते मिळाली होती. मी अनेक विरोधकांचे वैर पत्करून दत्तात्रय भरणे यांना आमदार केलं. आज तेच अहंकाराने वागत असतील, तर हे योग्य नाही. पैशाच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर राजकारण व्हायला हवं.” ते पुढे म्हणाले, “पक्षाने योग्य सन्मान ठेवला, आमचं ऐकलं, तर आम्ही पक्षासोबत आहोत. पण अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. जर आमच्याविरोधात पक्षाने निर्णय घेतला, तर नैतिकतेच्या भूमिकेतून मी राजीनामा देईन,” असंही गारटकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

इंदापुरात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

या घटनाक्रमामुळे इंदापूरचे राजकारण तापलं आहे. गारटकर गटाचा हा आक्रमक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मोठी राजकीय डोकेदुखी ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष लागले आहे की, पक्ष या वादाचा निकाल कसा लावतो आणि आगामी निवडणुकीवर या संघर्षाचा काय परिणाम होतो?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ncps senior leader has warned deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Dattatray Bharne
  • indapur news

संबंधित बातम्या

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका
1

अजित पवार सत्तेसाठी लाचार, सत्ता सोडून ते राहू शकत नाहीत; हर्षवर्धन सपकाळांची टीका

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
2

आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Ambegaon Election : आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली? ‘हे’ पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार
3

Ambegaon Election : आंबेगाव तालुक्यात महायुती फिस्कटली? ‘हे’ पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी
4

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.