Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त इंदापूर शहरात भक्तिभावाचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 04:27 PM
इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

Follow Us
Follow Us:

इंदापूर : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त इंदापूर शहरात भक्तिभावाचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आणि मंगल घंटानादात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला. इंदापूर ४० फुटी रोड येथील शंभु महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. नेताजी मित्र मंडळ, बट्टर गल्ली यांच्या वतीने सकाळपासून खिचडी, केळी आदी फराळाचे वाटप करण्यात आले.

 

गोरख पवार, अमित घाडगे, सुहास राऊत, विकी पवार, दीपक पवार, रोहित काळे, निखिल सुर्वे, आकाश ताटे, स्वप्नील पवार, सागर कवितके, किरण जावळे, प्रशांत रोकडे, राहुल राऊत, चेतन जाधव, रुपेश पवार, योगेश पवार आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. दुपारी १२ वाजता झालेल्या महाआरतीस नूतन पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे यांनी उपस्थित राहून शंभु महादेवाचे दर्शन घेतले. महिला-पुरुषांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

पहाटे ४ वाजता रुद्राभिषेक

दरम्यान, ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेव मंदिर येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. पहाटे ४ वाजता रुद्राभिषेक पार पडला. सकाळी ७ वाजता अष्टोप्रहर पूजेला प्रारंभ झाला. दुपारी २ ते ४ या वेळेत शारदा स्वरांजली संगीत कार्यक्रमाने भक्तिरसाची उधळण केली, तर सायंकाळी ७ वाजता महाआरती उत्साहात संपन्न झाली. सोमवारी (दि. १६) सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन, त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला श्री इंद्रेश्वर महादेव रथोत्सवाची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. नगराध्यक्ष भरत शहा आणि भाजपा नेते प्रदीप गारटकर यांनी रथ ओढत सहभाग नोंदविला. प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रथोत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत भक्ती आणि ऐक्याचा संदेश दिला.

शहरात भक्ती, उत्साह आणि एकात्मतेचे दर्शन

या रथोत्सवात नूतन पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे सहभागी झाले होते. त्यांनी भाविकांना पेढे वाटप करत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश उर्फ बाळासाहेब ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, शुभम पवार, अक्षय सूर्यवंशी, सुधाकर ढगे, संजय शिंदे, अमर गाडे, अनिकेत वाघ, अजिंक्य जावीर, प्रशांत उंबरे, स्वप्निल राऊत, रमेश शिंदे, संदीप वाशिंबेकर, अशोक इजगुडे, धीरज शहा यांच्यासह सर्व ट्रस्टी, शहरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने इंदापूर शहरात भक्ती, उत्साह आणि एकात्मतेचे दर्शन घडले.

Web Title: Religious programs have been organized in indapur city on the occasion of mahashivaratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • indapur news
  • maharashtra
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.