फोटो सौजन्य सोशल मिजिया
Neela Vikhe Patil : आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी स्विडन मध्ये खासदार झाल्या असून त्यांनी आपल्या पुतणीला सोशल मिडियाच्या ट्विटर अकांऊट द्वारे ट्विट करुन आपल्या लाडक्या पुतणीला शुभेच्छा दिल्या आहेत, नीला विखे पाटील यांची निवड स्वीडनच्या संसदेत निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत, आमच्या परिवारासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. असे मत कॅबिनेट मंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहे.
Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
नीला विखे पाटील या सुरुवातीपासूनच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय राहिल्या आहेत. तर स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणूनही तिने जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. माझे बंधू अशोक पाटील यांनी त्यांच्या मुलांसाठी जी मेहनत शिक्षणासाठी घेतलेली तिच मेहनत आज नीला विखे पटील यांच्या यशामागचे महत्त्वाचे कारण आहे. असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. नीला आता स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून तेथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, याचा मनापासून आनंद आहे.
माझी पुतणी नीला विखे पाटील हिची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून झालेली निवड ही आमच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तिने मिळविलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि स्वीडनमधील सार्वजनिक जीवनातील योगदानाची पावती आहे. नीला… pic.twitter.com/f006JznAUt — Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 20, 2026
निला विखे पाटील यांना राजकिय वारसा लाभला आहे, त्याचे काका हे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे, नीला विखे पाटील यांची पुतणी आहे. तर वडिल हे शिक्षण विभागात शिक्षणतज्ञ म्हणून काम केले आहे. त्याचे वडील डॉ.अशोक विखे पाटील त्यांचे वडील आहेत. तर दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.
41 वर्षीय नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली असून त्या स्वीडनच्या 349 सदस्यीय संसदेत म्हणजेच ‘रिक्सडॅग’मध्ये त्यांनी स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहे.
नीला विखे पाटील या विखे पाटील कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील असून, त्यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला आहे. मात्र, त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. त्या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या असून, जलसंपदा मंत्री आणि मंत्रिमंडळातील मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.
स्वीडनच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे 349 पैकी 176 जागा मिळवल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. तर मावळत्या पुराणमतवादी सरकारच्या बाजूला 173 जागा गेल्या आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
निला विखे पाटील यांचे शिक्षण स्वीडनच्या गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस येथून झाले आहे, त्या अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले आहे पुढे त्यांनी एमबीए ही पदवी मिळवली आहे. त्या स्वीडनच्य ‘ग्रीन पार्टी’ कडून स्टॉकहोम शहर मतदारसंघातून निवडणूक जिंकून त्या खासदार झाल्या. या आधी त्या स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या काळात त्या राजकीय सल्लागार म्हणूनही काम करत होत्या.






