Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neelam Gorhe News: मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच! विधान परिषद निवडणुकीपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी ठणकावून सांगितले

महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव टिकवणे मोजक्याच नेत्यांना जमते. नीलम गोऱ्हे या देखील आपली वर्चस्व साधत 2026 मध्ये पुन्हा संधी मिळवताना दिसत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 03:40 PM
अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Follow Us
Follow Us:
  • हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र उभा- नीलम गोऱ्हे
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची जबाबदारी दिल्याबद्दल कृतज्ञता
  • मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे
Neelam Gorhe News:  विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे अभिवादन करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली.

गोऱ्हे म्हणाल्या, “संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या त्यागातूनच महाराष्ट्र उभा राहिला आहे. जनतेच्या मनात आजही त्या हुतात्म्यांबद्दल आदर आणि भावना आहेत. मी त्या सर्वांना नतमस्तक आहे.” तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पुणे महापालिकेचा आणखी एक डांबर मिक्स प्रकल्प; येरवड्यातील प्लांटवरील ताण कमी होणार

महिलांच्या शोषणाच्या घटनांवर चिंता

नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये महिलांच्या शोषणाच्या घटना समोर आल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. कंपन्यां आणि कारखान्यांमधील महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत त्रुटी दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई आणि परतवाडा येथील घटनांचा उल्लेख करत, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मराठी भाषेबाबत ठाम भूमिका

मराठी भाषेच्या वापराबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, “प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करायला सुरुवात करावी. इतर राज्यांत गेल्यावर आपण तेथील भाषा वापरतो, मात्र मुंबईत कुठलीही भाषा चालते अशी समजूत काहींची आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, ही जाणीव जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाल्यास लोक आपोआप तिचा वापर वाढवतील. राज्य सरकार मराठीच्या वापरावर ठाम आहे आणि या काळात मराठी भाषा अनिवार्य करण्यावर भर दिला जात आहे.”

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवास सुलभ

पुणे-मुंबई महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून, सुरक्षितता वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai-Pune Missing Link: आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात, 

नीलम गोऱ्हेंना सलग पाचव्यांदा विधानपरिषदेची संधी

महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव टिकवणे मोजक्याच नेत्यांना जमते. नीलम गोऱ्हे या देखील आपली वर्चस्व साधत 2026 मध्ये पुन्हा संधी मिळवताना दिसत आहेत. यावेळी त्या विधानपरिषदेवर जाण्याचा ऐतिहासिक ‘पंच’ पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. 2002 पासून सुरू झालेला त्यांचा विधानपरिषद प्रवास सलग 25 वर्षांपर्यंत पोहोचत असून, ही वाटचाल त्यांच्या राजकीय कौशल्याची साक्ष देणारी ठरली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता आणि सातत्यपूर्ण सक्रियता ही त्यांच्या यशामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. शिवसेना (शिंदे गट) मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी आपला प्रभाव कायम राखला आहे.

 

Web Title: Neelam gorhe on maharashtra day tributes to martyrs and stance on marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.