Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनधिकृत इमारतींकडे दुर्लक्ष; स्मशानभूमीवर तत्परतेने कारवाई कशी?

मुंबई उपनगरातील मालाड येथील एरंगळ गावातील समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधवांची स्मशानभूमी अनधिकृत असल्याची तक्रार चेतन व्यास यांनी केली होती. ही स्मशानभूमी कोस्टल झोन रेग्युलेशन (सीआरझेड) च्या नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याच आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 21, 2022 | 10:11 PM
अनधिकृत इमारतींकडे दुर्लक्ष; स्मशानभूमीवर तत्परतेने कारवाई कशी?
Follow Us
Close
Follow Us:
  • उच्च न्यायालयाची मुंबई उपनगर जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारणा
  • युक्तिवाद पूर्ण; न्यायालयाने निकाल ठेवला राखून
मुंबई – मुंबईतील विमानतळ परिसरातील अनधिकृत इमारतींवर कारावई करण्यास जिल्ह्याधिकारी टाळाटाळ करतात. मात्र, मालाड येथील समुद्रनकिनाऱ्यावरील कोळी बांधवांची स्मशानभूमी कोणतीही सुनावणी न घेता पाडण्यात येते त्यासाठी तेवढी तत्परता कशी दाखवता? असा सवाल बुधवारी उच्च न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारला आणि याचिकेवरील आपला निकाल राखून ठेवला.

मुंबई उपनगरातील मालाड येथील एरंगळ गावातील समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधवांची स्मशानभूमी अनधिकृत असल्याची तक्रार चेतन व्यास यांनी केली होती. ही स्मशानभूमी कोस्टल झोन रेग्युलेशन (सीआरझेड) च्या नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याच आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. साल २०२१ मध्ये न्यायालयानं महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए), जिल्हाधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी संयुक्तपणे जागेची तपासणी केली. स्मशानभूमी बेकायदेशीरपणे आणि आवश्यक त्या परवानगीशिवाय बांधली असल्याचा अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून ही स्मशानभूमी पाडण्यात आली. या कारवाईला विरोध करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

स्मशानभूमी नियमानुसार नसल्याचा अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी स्मशानभूमी पाडण्याचे आदेश दिले मात्र त्यापूर्वी नियमानुसार मच्छीमार बांधवांची बाजू ऐकून घेतली नाही. या सर्व ढिसाळ प्रकारावर मुख्य न्या. दत्ता यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना कायद्याची माहिती होती पण तरीही त्यांनी नियमित प्रक्रियेचे पालन केले नाही. दुसरीकडे विमानतळ परिसरात असलेल्या उंच इमारतींवर कारवाई करण्याच्या आदेशामध्ये त्यांना खूप प्रश्न निर्माण झाले होते असा टोलाही न्यायालयाने लगावला.

एमसीझेडएमएला फटकारले
चौकशी न करता स्मशानभूमीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिल्याबद्दलही न्यायालयाने एमसीझेडएमएला फटकारले. चौकशीसाठी प्रथम अधिकारी नियुक्त करणे हे एमसीझेडएमएचे कर्तव्य नाही का?, अशी विचारणा खंडपीठाने एमसीझेडएमएला केली. मृत्यूनोंदणी नोंदवहीतून फेब्रुवारी १९९१ सीआरझेड नियमावलीच्या अधिसूचनेच्या आधीपासूनच स्मशानभूमी त्या जागेवर अस्तित्वात असल्याचे आडळून आले. २५ डिसेंबर १९९० आणि १६ फेब्रुवारी १९९१ रोजी स्मशानभूमीत दोन अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावरून अधिसूचनेपूर्वी स्मशानभूमी तेथे होती, असेही न्यायालयाने नमूद केले आणि आपला निकाल राखून ठेवला.

Web Title: Neglect of unauthorized buildings how to act quickly on the cemetery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 10:11 PM

Topics:  

  • Marathi News
  • Unauthorized buildings

संबंधित बातम्या

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!
2

Sangli News : “मतदान करणाऱ्यांची तोंडं आता बंद का?” सांगलीतून काँग्रेसचा भाजपला थेट सवाल!

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!
3

Bhusawal forced conversion case : पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई ,मुख्य आरोपी गजाआड!

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट
4

Vasai Virar News : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांची महानगरपालिकेला भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.