Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Government : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7/12 वरील जमीन हिस्सा विक्रीसाठी नवा नियम, फडणवीस सरकारचे नवे आदेश

Maharashtra Government : सामायिक 7/12 उताऱ्यावरील जमीन हिस्सा विक्रीचे नियम जाणून घ्या. मोजणीची ‘क’ प्रत असल्यास संमतीची अट काय आणि प्रत नसल्यास NOC का आवश्यक आहे?

  • By विवेक
Updated On: Oct 22, 2026 | 05:04 PM
farmer 712 rules

farmer 712 rules

Follow Us
Follow Us:
  • सामायिक 7/12 वरील जमीन विक्रीचे नवे नियम
  • मोजणीची ‘क’ प्रत जोडल्यास दस्त नोंदणीचा मार्ग मोकळा
  • ‘क’ प्रत नसल्यास लेखी संमती किंवा NOC आवश्यक
 

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सामायिक शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत उपयुक्त बातमी समोर आली असून या व्यवहारांबाबत महसूल विभागाने नवी कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. (Maharashtra Government)

एकाच 7/12 उताऱ्यावर अनेक सहहिस्सेदारांची नावे असतील, तर त्यातील एखाद्या व्यक्तीला आपला हिस्सा विकताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत महसूल विभागाने कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. या नियमांमध्ये भूमिअभिलेख विभागाच्या मोजणीच्या ‘क’ प्रतीला विशेष महत्त्व आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हि नवी कार्यपद्धती लागू कारण्यात आली आहे.

‘क’ प्रत असल्यास काय होणार?

सामायिक 7/12 उताऱ्यावरील जमिनीतील आपला हिस्सा विकायचा असल्यास संबंधित सहहिस्सेदाराने भूमिअभिलेख विभागाकडून मिळालेली मोजणीची ‘क’ प्रत विक्रीच्या दस्तासोबत जोडणे महत्त्वाचे आहे.

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

ही प्रत दस्तासोबत जोडलेली असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितल्याशिवाय दुय्यम निबंधकांना दस्ताची नोंदणी करता येईल, अशी कार्यपद्धतीत तरतूद आहे.

‘क’ प्रत नसेल तर संमती आवश्यक!

इथेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. विक्री करायच्या जमिनीच्या भागाची मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध करून दिली नाही किंवा ती दस्तासोबत जोडली नाही, तर इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा NOC आवश्यक राहील.

अशी संमती दस्ताचा भाग म्हणून जोडलेली नसेल, तर संबंधित दस्ताची नोंदणी करता येणार नाही, असं दिलेल्या कार्यपद्धतीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

सामायिक जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रांची पूर्तता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जमीन विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी मोजणीची ‘क’ प्रत उपलब्ध आहे का, ती दस्तासोबत जोडली आहे का आणि आवश्यक असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती घेतली आहे का, हे तपासून घ्या.

जमीन खरेदी करणाऱ्यांनीही केवळ 7/12 उतारा पाहून व्यवहार निश्चित करू नये. विक्री होणाऱ्या हिस्स्याची ओळख, मोजणीची कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची खातरजमा करणं फायद्याचं ठरेल.

जमीन व्यवहारात पारदर्शकता वाढणार?

या कार्यपद्धतीचा उद्देश सामायिक जमिनीच्या हिस्सा विक्री प्रक्रियेत स्पष्टता आणणे आणि भविष्यात उद्भवणारे वाद कमी करण्यास मदत करणे हा आहे. मात्र, विशिष्ट व्यवहारात कोणती कागदपत्रे लागू होतील, यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय आणि भूमिअभिलेख कार्यालयाकडून खात्री करून घ्यावी.

अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 कोटींची मदत; 17 हजार 245 शेतकऱ्यांना दिलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सामायिक 7/12 वरील जमीन हिस्सा विकताना ‘क’ प्रत असल्यास NOC लागतो का?

    Ans: विक्रीच्या दस्तासोबत मोजणीची ‘क’ प्रत जोडलेली असल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा NOC मागण्याची आवश्यकता नाही.

  • Que: ‘क’ प्रत नसेल तर जमीन विक्रीच्या दस्ताची नोंदणी होईल का?

    Ans: ‘क’ प्रत जोडलेली नसल्यास इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ही संमती दस्तासोबत जोडलेली नसेल, तर नोंदणी करता येणार नाही.

  • Que: या नियमांचा फायदा कोणाला होणार?

    Ans: सामायिक 7/12 उताऱ्यावर नाव असलेल्या सहहिस्सेदारांना आणि जमीन खरेदी करणाऱ्यांना आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्टता मिळण्यास मदत होईल. त्यामुळे वादग्रस्त व्यवहारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Maharashtra government shared 7 12 land sale registration c copy noc rules vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Farmers News
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज : आमदार रोहित पवार
1

शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष, दुष्काळी परिस्थितीवर लक्ष देण्याची गरज : आमदार रोहित पवार

Amravati: अमरावतीतील शिक्षण संस्थेच्या चौकशीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; राजकीय वातावरण तापलं
2

Amravati: अमरावतीतील शिक्षण संस्थेच्या चौकशीवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; राजकीय वातावरण तापलं

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
3

Drought News : दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! ५१ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय
4

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.