Nitesh Rane is aggressive as Rahul Gandhi pays tribute to Chhatrapati Shivaji Maharaj
सिंधुदुर्ग : राज्यासह देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. यंदा 395 वी जयंती साजरी केली जात आहे. यामुळे सर्व राष्ट्रीय नेत्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आहे. मात्र सध्या कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पोस्टची चर्चा आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे राजकारण रंगले असून मंत्री नितेश राणे यांनी देखील टीका केली आहे.
नितेश राणे यांनी सिंधुदुर्गामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. राजकोट येथील पुतळा खाली कोसळला होता. यामुळे भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर आता राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा पुतळा उभारण्याची तयारी सुरु आहे. याबाबत मंत्री नितेश राणे म्हणाले की, “राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत. सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जातो आहे. जो डाग जिल्ह्यावर लागलेला आहे तो पुसला जाईल. 100 दिवसात हा पुतळा पूर्ण केला जाईल,” असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावले आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले, “फोटोसेशन करून आम्ही पळालो नाही. फोटोसेशन करण्यासाठी त्या वेळेला पेग्विन सुद्धा आले होते. प्राणी संग्रहातले प्राणी इथे आले होते आता कुठे आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या पुतळ्यासंदर्भात एक पत्र लिहावं असं त्यांना का वाटलं नाही,” असे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
नितेश राणे यांनी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे टीका केली आहे. नितेश राणे यांनी राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. नितेश राणे म्हणाले की, “औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा विरोध होता. संजय राऊत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघत होते. संजय राऊत यांनी आमदारांना फोन केला होता. पण जमायच्या टायमाला पाच-सहा आमदार जमले. संजय राऊत यांनी खरं सांगावं त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं होतं का? आमच्याकडे असे सांगणारे काही विटनेस आहेत. आमच्याकडे असे काही सांगणारे आमदार आहेत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याला संजय राऊत यांचा विरोध होता. दुसऱ्याच्या घरात बघू नकोस स्वतःच्या बुडाखाली काय लपलय त्याची माहिती महाराष्ट्राला द्या. उद्धव ठाकरे यांचा गेम संजय राऊत यांनी केला,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.