Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी! नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात; नगराध्यक्षा पूजा विरकर यांचे कौतुक

आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी सातेवाडी (खटाव) येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. म्हसवड येथील मोफत शिबिरात १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 08, 2026 | 06:28 PM
कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी! नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात

कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी! नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात

Follow Us
Follow Us:

 

  • कॅन्सरग्रस्तांना मिळणार नवसंजीवनी!
  • नितीन तिवाटणे यांच्या हॉस्पिटल संकल्पासाठी सरसावले हात
  • नगराध्यक्षा पूजा विरकर यांचे कौतुक
म्हसवड दि.८: कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांच्या संकल्पामुळे असंख्य रुग्णांना नवसंजिवनी मिळणार असल्याचे मत म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी व्यक्त करीत तिवाटणे यांच्या संकल्पपुर्तीसाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन म्हसवडकरांना केले. म्हसवड शहरात सर्वज्ञ सेवा संस्था व मुक्ता कँन्सर क्लिनिक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कँन्सर तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या, यावेळी डॉ. मुकुल घरोटे, डॉ. अभिजीत खाडे, डॉ. जयदेव काळेल, डॉ. जितेंद्र तिवाटणे, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, आरोग्य मित्र नितीन तिवाटणे आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्षा विरकर म्हणाल्या की तिवाटणे यांनी म्हसवड शहरात अशा प्रकारच्या शिबाराचे आयोजन केले आहे ते कार्य प्रेरणादाई आहे, आजच्या धकाधकीच्या जिवनात माणसाला असंख्य आजार त्यांच्या न कळत त्यांना होत आहेत, त्याची योग्यवेळी तपासणी झाली तर त्या आजाराचे निदान होते, कोणत्याही आजाराचे निदान होणे हे सर्वात महत्वाचे आहे, आज काल अनेकांना कर्क रोग होत आहे, त्यावर वेळीच उपचार घेतल्यास तो पुर्णपणे बरा होतो त्यासाठी प्रत्येकाने न घाबरता स्वत:ची शारीरिक तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. मुकुल घरोटे यांनी बोलताना सांगितले की कर्करोगाला कोणीही घाबरु नये, मात्र त्याकडे कोणी दुर्लक्ष ही करु नये, तो पुर्णपणे बरा होतो मात्र तो बळावला तर रुग्ण दगावु पण शकतो यासाठी प्रत्येकाने सकस आहार व नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. मी आजवर हजारो रुग्ण पाहिले आहेत त्यांना आजाराचे निदान उशीरा झाले आहे, मात्र म्हसवड शहरात नितीन तिवाटणे यांनी स्वत: च्या आईचा या दुर्धर आजाराने बळी घेतल्याने यापुढे असा बळी कोणाचा जावु नये यासाठी सुरु केलेला लढा खरोखरच कौतुकास्पद आहे, त्यांनी अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन केल्याने अनेकांना येथे मोफत तपासणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तपासणी साठी येथे कोणतीही फी आकारली जाणार तर नाहीच या शिवाय प्रत्येकाचा तपासणी रिपोर्ट हा गोपनीय राहणार आहे.

Satara News: राज्यातील कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची थकबाकी प्रलंबित, साताऱ्यातील कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

तिवाटणे यांनी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे सुरु केलेले कँन्सर हॉस्पिटल उभारणीचे काम हे खुपच महान काम आहे.त्याठिकाणी कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी नवसंजिवनी दिली जाणार आहे, अद्यावत मशीन व तज्ञ डॉक्टरांची टिम तेथे तैनात केली जाणार आहे. याशिवाय गोशाळा उभारणीचे काम तेथे होणार आहे, तिवाटणे हे पेशाने इंजिनियर आहेत पण त्यांचा संकल्प हा अतिशय स्तुत्य आहे, कोणी डॉक्टरसुध्दा असा संकल्प करणार नाही तो त्यांनी केला आहे, त्यांच्या सारख्या व्यक्तीमुळेच आज कँन्सरग्रस्त रुग्णांना जगण्याची एक नवी उमेद मिळत आहे. त्यांनी हाती घेतलेले काम हे सर्वसामान्यांसाठी असल्याने सामान्य नागरिकांनीही पुढे येवुन त्यात आपले योगदान द्यावे, शेवटी लोकांचा सहभाग हा खुप महत्वाचा आहे, लोकवर्गणीतुन हे स्वप्न साकारलं जातयं यासाठी लोकांनीही पुढे यावे असे आवाहन शेवटी डॉ. घरोटे यांनी केले.

यावेळी इंजिनियर नितीन तिवाटणे म्हणाले की मी माझ्या आई ला या आजाराने तेव्हा तीला काय त्रास झाला हे अगदी जवळुन पाहिले आहे, त्यामुळे भविष्यात असा त्रास कोणालाही होवु नये यासाठी येथेच एक कँन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला, त्यासाठी मी अनेक ठिकाणी जागा शोधली पण मला हवी तशी ती मिळाली नाही, जेव्हा माझे मित्र नितीन शेडे – पाटील यांना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वमालकीची एक एकर जागा यासाठी मोफत देवु केली, त्यामुळे खटाव तालुक्यातील सातेवाडी परिसरात हे रुग्णालय सुरु करण्याचा घाट घातला आहे, आता कामाला लवकरच सुरुवात होत असुन तेथील माळरानावर अशा रुग्णांना नवसंजिवनी देण्याचे मोठं काम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी डॉ. विकास बाबर, डॉ. कुलकर्णी, डॉ. शहा, नितीन चिंचकर, डॉ.शितल तिवाटणे, सविता तिवाटणे, सचिन विरकर या सह बहुतांशी नागरिक उपस्थित होते. यावेळी १३० रुग्णांची आरोग्य तपासणी येथे करण्यात आली.

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Web Title: Nitin tiwatne cancer hospital satewadi khatav mhaswad health camp updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • cancer
  • Hospital
  • Satara

संबंधित बातम्या

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन
1

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन

Satara Crime: घरात डोकावल्याचा संशय… चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली; उपचारादरम्यान मृत्यू, 24 तासांत आरोपी जेरबंद
2

Satara Crime: घरात डोकावल्याचा संशय… चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली; उपचारादरम्यान मृत्यू, 24 तासांत आरोपी जेरबंद

Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर
3

Satara News: कराड पालिकेला भाजपचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; रखडलेल्या विकासकामांवर प्रशासनाला धारेवर

वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन
4

वाई येथील डॉक्टरांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.