पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावालगत असलेल्या लांडकवाडी आणि तिसगाव जवळील शिरापुर गावामध्ये स्वातंत्र्य कालखंडानंतरही लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने लहान मुलांना चिखल तुटवत शाळेचा जावे लागत आहे. पाथर्डी तालुक्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या लांडकवाडी व शिरापुर गावामध्ये लहान मुलांच्या शाळेच्या सोयीसाठी व रस्त्यासाठी आजही गावकरी पक्की सडक होईल अशी आशा बाळगून आहेत. उन्हाळ्यात तीव्र पाण्याच्या झळा किंवा पावसाळ्यात लांडकवाडी आणि शिरापुरमध्ये येण्या-जाण्यासाठील होणारा त्रास या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्ते, वीज, पाणी, आरोग्य किमान या पायाभूत सुविधा तरी गावामध्ये असाव्यात याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
[blockquote content=”लांडकवाडी हे गाव डोंगराळ भागात वसलेले असल्याने लोकप्रतिनिधींच्या कायम नजरेआड असलेले दुर्लक्षित गाव लांडकवाडी झाले आहे. गावातील लहान चिमुकल्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी रस्ता व्हावा ही आमची इच्छा आहे या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी लहान मुलांच्या शाळेसाठी रस्ता करून द्यावा एवढीच माफक अपेक्षा ” pic=”” name=”- छबुबाई गर्जे , सरपंच, लांडकवाडी”]
तिसगाव जवळील शिरापुर ( हाडकी) ग्रामपंचायत येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य या लोकप्रतिनिधी उदासीनता यामुळे लहान मुलांचे शाळेत येण्या जाण्यासाठी चे प्रचंड हाल होत आहेत केवळ भाऊबंदकी व राजकारणासाठी हाडकी रस्त्यावर मुरूम टाकला जात नसून ग्रामपंचायत ने ताबडतोब लहान मुलांच्या शाळेच्या रस्त्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी
– संजय पाखरे, शिरापुर