Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protocol for MPs and MLAs: दोषी आमदार-खासदारांना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशन अर्ज सादर करताना किंवा छाननी व सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या आमदार-खासदारांनाही विशेष सन्मान देण्याची गरज नसल्याचे आदेशात नमूद आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 03, 2026 | 11:51 AM
Mantralaya News, CMO Maharashtra, Mantralaya Staff Reposting,

Mantralaya News, CMO Maharashtra, Mantralaya Staff Reposting,

Follow Us
Follow Us:
  • फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा न्यायालयात पक्षकार (Party) म्हणून हजर राहणाऱ्या आमदार-खासदारांना अधिकाऱ्यांनी विशेष सन्मान देण्याची सक्ती नाही
  • लोकप्रतिनिधींनी कार्यालयात प्रवेश केल्यावर अधिकाऱ्यांनी उभे राहून अभिवादन करणे किंवा त्यांचा ‘व्हीआयपी’ सन्मान करणे आता अनिवार्य असणार नाही.
  • प्रशासकीय कामकाजात स्पष्टता आणण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल टिकवण्यासाठी सरकारने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Protocol for MPs and MLAs:  राज्यातील प्रशासकीय कामकाात शिस्त आणि समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. लोकप्रतिनिधींच्या सन्मानाच्या नियमांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यापुढे फौजदारी आणि इतर प्रकरणात दोषी ठरलेल्या तसेच, चौकशी किंवा सुनावणीसाठी पक्षकार म्हणून उपस्थित राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना सरकारी अधिकाऱ्यांनी विशेष सन्मान देण्याची गरज नाही, असा सुधारित आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

मागील काही वर्षांत आमदार आणि खासदाराकडून सरकारी अधिकाऱ्यांनी सन्मान न दिल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आदर न मिळाल्यास किंवा अधिकाऱ्यांनी काम करण्यास नकार दिल्यास, काही लोकप्रतिनिधी विधीमंडळात थेट त्यांच्याविरओदात हक्कभंग प्रस्ताव मांडत असल्याचे प्रकारही समोर आले. या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा निर्णय घेतला.

महिला आरक्षणासाठी राजीव गांधी अन् सोनिया गांधींचे मोठे योगदान, महिला आरक्षण उपकार नाही तर…; सपकाळांनी ठणकावून सांगितलं

अधिकाऱ्यांच्या तक्रारींचीही दखल

तर दुसरीकडे आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांकडूनही अशाच प्रकारच्या गंभीर तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. काही दोषी ठरलेले लोकप्रतिनिधी कार्यलयात आल्यानंतर त्यांना अभिवादन करावे लागत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या परिस्थितीमुळे प्रशासकीय कामकाजावरही गंभीर परिणार होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने नव्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

जुन्या परिपत्रकांचे एकत्रिकरण

राज्य सरकारने १७ जुलै २०१५ ते २० ऑगस्ट २०२१ या काळात जारी केलेल्या विविध परिपत्रकांचे एकत्रिकरण करून हा नवा आदेश तयार केला आहे. या आदेशात अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना सन्मान देण्याच्या मर्यादा आणि नियम अधिक स्पष्टपणे नमुद करण्यात आल्या आहेत.

शक्ती कायदासाठी अधिवेशन बोलवा; आमदार रोहित पवारांची मागणी

दोषी लोकप्रतिनिधींना विशेष सन्मान दिला जाणार नाही

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार फौजदारी किंवा इतर प्रकरणात दोषी ठरलेले आमदार/खासदार चौकशी किंवा सुनावणीसाठी पक्षकार म्हणून उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी यांना सरकारी कार्यालयात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात विशेष अभिवादन करण्याची गरज नाही. अधिकाऱ्यांनी या लोकप्रतिनिधींना सामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक द्यावी, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशन अर्ज सादर करताना किंवा छाननी व सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या आमदार-खासदारांनाही विशेष सन्मान देण्याची गरज नसल्याचे आदेशात नमूद आहे. सर्वांना कायदा आणि नियमांनुसार समान वागणूक देणे बंधनकारक राहील.

या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अधिकारी कोणत्याही दबावाखाली न येता नियमांनुसार काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

 

Web Title: No vip treatment for convicted lawmakers maharashtra govt issues strict guidelines for officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.