Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: एक्झिट पोल नव्हे, ‘हे’ चार मुद्दे ठरवणार महाराष्ट्रात कुणाचे सरकार स्थापन होणार?

1995 पासून आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. 1995 मध्ये शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 20, 2024 | 05:54 PM
Maharashtra Election 2024: एक्झिट पोल नव्हे,  ‘हे’ चार मुद्दे ठरवणार महाराष्ट्रात कुणाचे सरकार स्थापन होणार?
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होत आहे. 6 वाजता मतदान प्रक्रिया संपेल. पण त्या आगोदरच राज्यभरात यावेळी कुणाचे सरकार स्थापन होणार? याबाबत आताच नव्हे तर गेल्या अनेक महिन्यांपासून तर्कवितर्क काढले जाता आहेत. मतदानानंतर तज्ज्ञ एक्झिट पोलच्या डेटावरूनही अनेक तर्कवितर्क  काढले जात आहेत.पण  मात्र गेल्या काही वर्षांपासून एक्झिट पोलचा डेटा फेल होताना दिसत आहे.  पण अशा परिस्थितीत एक्झिट पोल व्यतिरिक्त, या 4 मुद्द्यांवरून महाराष्ट्रात कोणाचे सरकार बनणार आहे हे समजले पाहिजे?

– छोटे पक्ष आणि अपक्षांच्या कामगिरी

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक दोन पक्षांमध्ये गुंडाळली गेली होती. असे असतानाही विधानसभेच्या 10 जागांवर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे वर्चस्व होते. वंचित विकास आघाडी, बहुजन विकास आघाडी, एआयएमआयएम यांसारखे छोटे पक्षही विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवू शकतात, असे बोलले जात आहे.

इतकेच नव्हे तर यंदाच्या निवडणुकीत विधानसभेच्या दोन डझन  जागांवर अपक्ष उमेदवार मोठ्या ताकदीने उभे आहेत. धक्कादायक म्हणजे, ऐन मतदानाच्या दिवशीच सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यादेखील या ठिकाणी लोकसभा खासदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत 13 अपक्ष उमेदवार जिंकले होते. 2014 मध्ये 8 उमेदवार जिंकले होते. पण विधानसभा निवडणुकीत यावेळी  त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास हे अपक्ष उमेदवारच किंगमेकरची भूमिका बजावू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2019 च्या निवडणुकीत 11 छोट्या-मोठ्या पक्षांनी 14 विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. यावेळी या छोट्या पक्षांच्या कामगिरीवरच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Karale Master : कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल

– लोकसभेत महाविकास आघाडीची कामगिरी

लोकसभा निवडणुकी महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत झाली होती. आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी आणि महायुतीची थेट लढत होणार आहे.  याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसारखे छोटे-मोठे पक्षही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 83, अजित पवार यांच्या पक्षाला 6 तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 38 विधानसभेच्या जागांवर आघाडी मिळाली होती.  तर तसेच काँग्रेसला 63 जागांवर, शिवसेना-उद्धव यांना 56 जागांवर तर राष्ट्रवादी-शरद यांना 38 जागांवर आघाडी मिळाली. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला 2 जागां मिळाल्या तर अपक्षांना 7 जागांवर आघाडी मिळाली होती.

लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी आहेत. ज्या जागांवर भाजपला आघाडी मिळाली होती त्या जागांवर बहुजन विकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय दुसरीकडे महाविकास आघाडीनेही समाजवादी पक्ष आणि शेतकरी संघटनाना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtra Assembly Election: पनवेल ग्रामीण मतदानकेंद्राबाहेर ‘शिट्टी’ जोरात

 -65 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट या प्रादेशिक पक्षांची अस्तित्त्वाची लढाई आहे. पण यापेक्षाही भाजप आणि काँग्रेस या दोन  राष्ट्रीय पक्षांच्या कामगिरीवरूनही कुणाचे सरकार स्थापन होणार, याचा निर्णय होणार आहे.  राज्यातील 65 जागांवर काँग्रेस आणि भाजपची थेट लढत होणार आहे. यातील बहुतांश जागा या विदर्भातील आहेत. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते.

पण, लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या बाजूने मैदानात उतरले आहे.भाजपसाठी आरएसएस मैदानात उतरल्यामुळे याठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. विदर्भातील  या 65 जागांवर ज्या पक्षाला सर्वाधिक आघाडी मिळेल तो पक्ष महाराष्ट्रातील  बहुमताच्या आकड्याला सहज स्पर्श करू शकते, असेही बोलले जात आहे. विधानसभेच्या 288 जागा असलेल्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे, यावेळी भाजपने 149 उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

Maharashtra Election 2024 : लोकशाहीचा उत्सव! राजकीय नेत्यांनी त्यांच्या मूळ गावी

 –  ज्या पक्षाला बहुमत मिळणार त्यांचं सरकार स्थापन होणार

1995 पासून आजपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. 1995 मध्ये शिवसेना आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. 1999 मध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाने मिळून सरकार स्थापन केले. 2004 मध्येही महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार स्थापन झाले. 2009 मध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून सरकार स्थापन केले होते. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे संयुक्त सरकार स्थापन झाले. 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केले.

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, 2024 मध्ये आम्ही युतीचे सरकार बनवू आणि त्यानंतर 2029 मध्ये आम्ही एकटे सरकार बनवू. भाजपची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी युती आहे. दुसरीकडे, भारताचीही युती आहे. येथेही तिन्ही पक्ष जवळपास समसमान जागांवर निवडणूक लढवत आहेत..

आवळा, हळद-आलं 10 पट वाढवतील रोगप्रतिकारकशक्ती, कसे कराल सेवन

Web Title: Not exit polls these four issues will decide whose government will be formed in maharashtra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 05:50 PM

Topics:  

  • maharashtra election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.