Maharashtra Assembly Election: पनवेल ग्रामीण मतदानकेंद्राबाहेर 'शिट्टी' जोरात
दिपक घरत/ रायगड: विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर आहे. मात्र असं असूनही पनवेल ग्रामीण भागात पोलिसयंत्रणेकडून झालेली चूक महागात पडली आहे. पनवेल ग्रामीण मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रा बाहेर उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार न करण्याचा शिरस्था आहे.मात्र पोलिसांकडूनच अनावधानाने या शीरस्त्याचे उल्लंघन झाले आहे. असं म्हटलं जात आहे.
Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज
मतदानाच्या दिवशी सांकेतिक किंवा कोण्त्याही प्रकारे प्रचार करणं हा कायद्याने गुन्हा आहे. असं असूनही शेकापच्या कार्यकर्यांनी कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवलं आहे असं म्हटलं जात आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपा तर्फे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले प्रशांत ठाकूर, शेकाप तर्फे आमदार बाळाराम पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार माजी नगरसेविका लीना गरड यांच्यात मुख्य लढत आहे. शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह बहाल केलं. या चिन्हावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी पनवेल विभागात जोरदार प्रचार केला होता. मात्र मतदान केंद्रावर शेकापच्या कार्यकत्यांनी शिट्टी वाजवल्याचं पाहायला मिळालं आहे.
मतदान केंद्राबाहेर सुरक्षेच्या दृष्टीकोनातूून पोलिस यंत्रणा तैनात आहे त्याचबरोबर शेकापचे काही कार्यकर्तेदेखील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर उपस्थित होते. याचपार्श्वभूमीवर पनवेल ग्रामीण मतदान केंद्राबाहेर चारचाकी आणि दुचाकींमुळे वाहतूकीचा खोळंबा झाला. त्यामुळे मतदान केंद्राबाहेरील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवली होती. दरम्यान या सगळ्यामुळे अप्रत्यक्षपणे शिट्टी वाजवून पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदार केंद्रबाहेर शेकपच्या बाळाराम पाटील यांचा प्रचार केला, असल्याचं घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचं म्हणणं आहे. ऐन मतदानाच्या दिवशी वाहनांसाठी प्रवेश नसताही काही रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि इतरांनाही त्याची समस्या जाणवत होती. त्यामुळे प्रसंगाचं भान राखत पोलिस यंत्रणांनी तेथील गाड्या बाजूला करण्यासाठी शिट्टीचा वापर केला होता. दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असूुनल देखील केवळ वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे पोलिसांना शिट्टीचा वापर कारावा लागला, असं स्पष्ट झालं आहे.
मतदान केंद्र क्रमांकांची माहिती मतदारांपर्यत पोहचवण्यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मार्गदर्शन केंद्र उभारले होते. या ठिकाणी मतदारांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात 7 ते 1 वाजे पर्यत 34.84 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती.विधानसभा मतदारसंघ निहाय पनवेल विधानसभा क्षेत्रात 30.56 टक्के, कर्जत विधानसभा मतदार संघात 36.06 टक्के, उरण विधानसभा मतदार संघात 37.79 टक्के, पेण विधानसभा मतदारसंघात 32.01 टक्के, अलिबाग विधानसभा मतदार संघात 40.86 टक्के, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 33.26 टक्के तर महाड विधानसभा मतदार संघात 37.04 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात ठिकठकाणी नागरिकांनी जबाबदारीने मतदाराचा हक्क बजावला आहे.