विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. यंदाची निवडणुक ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये लोकशाहीचा हा उत्सव उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. राजकीय नेत्यांनी देखील आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला आहे. येत्या 23 तारखेला राज्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व नेत्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Maharashtra Assembly Election 2024 Results live news
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील मतदान केंद्रात कुटुंबियांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आई व अमृता फडणवीस यांच्यासह यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
बारामतीचे उमेदवार अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदान केले.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्वमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासह पूर्ण मुंडे परिवाराने परळीतील नाथरा येथे मतदान केले.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांन आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अंजली आंबेडकर यांनी अकोल्यातील पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, गोकुळ कॉलनी येथे मतदानाचा अधिकार बजावला.
बारामती येथील काटेवाडी येथे शरद पवार गटाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
party change leader - 2024-11-20T163559.047