Immunity Power Increase Foods: हिवाळा सुरू झाला की, सर्दी, फ्लू आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांचा धोका सहसा वाढतो. थंड वाऱ्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि आपण लवकर आजारी पडू शकतो. अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे खूप गरजेचे आहे. पण मग यासाठी नक्की काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचा. कौशांबी येथील यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एमडी डॉ. पी.एन. अरोरा यांच्या मते, हळद, आवळा, आले, मध आणि बदाम यांसारखे सुपरफूड हिवाळ्यात प्रतिकारशक्ती दहापट वाढवण्यास मदत करतात. आपल्या आहारात याचा समावेश कसा करावा हे जाणून घ्या. (फोटो सौजन्य - iStock)
शरीरात प्रतिकारशक्ती व्यवस्थित नसेल तर व्यक्ती सतत आजारी पडते हे सत्य आहे. पण नैसर्गिकरित्या तुम्ही कशा पद्धतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता असा प्रश्न असेल तर तुम्ही काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन करू शकता. हे पदार्थ कोणते आहेत जाणून घ्या
आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे, जो शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करतो. तो रस, चटणी किंवा मुरंबा म्हणून खाऊ शकतो. आवळ्याच्या सेवनाने शरीराला अँटिऑक्सिडंट्स मिळतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे रिकाम्या पोटी देखील घेतले जाऊ शकते, जे विशेषतः हिवाळ्यात फायदेशीर आहे.
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सूज कमी करते. हळद हे दुधात मिक्स करून किंवा कडधान्ये आणि भाज्यांमध्ये घालता येते आणि त्याचे सेवन करता येते. यामुळे शरीराला शक्ती तर मिळतेच शिवाय आजारांपासूनही बचाव होतो
आल्यामध्ये आढळणारे अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज आणि वेदनापासून आराम मिळवण्यास मदत करतात. आले रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि सर्दी आणि खोकला प्रतिबंधित करते. चहामध्ये आलं घालून किंवा आल्याचा काढा बनवून तुम्ही ते पिऊ शकता. याशिवाय आल्याचा रस मधात मिसळूनही सेवन करता येते
मध हे एक उत्कृष्ट नैसर्गिक अँटीबायोटिक आहे, जे सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने घशातील दुखणे आणि सूज कमी होते. हे शरीराला हायड्रेट करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते
बदाम आणि अक्रोड सारख्या सुक्या फळांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला शक्ती आणि ऊर्जा देतात. हिवाळ्यात ते थंडीपासून शरीराचे संरक्षण तर करतातच शिवाय मानसिक शक्तीही वाढवतात