
पक्ष्यांच्या भरारीला नायलॉन मांजाचा लगाम! संक्रांतीत पतंगबाजीत ७२ पक्षी जखमी १० पक्षी रुग्णालयात दाखल
संक्रांतीदरम्यान झालेल्या शहरात पतंगबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी झाल्याचे समोर आले आहे. परेल वैद्यकीय रुग्णालयाच्या माहितीनुसार एकूण ७२ जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, यातील ८ पक्ष्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये १२ घारी आणि १ बगळा यांचा समावेश आहे. गंभीर जखमी अवस्थेत १० पक्ष्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरित पक्ष्यांवर घटनास्थळीच उपचार करून त्यांना निसर्गात सोडण्यात आले. हे सर्व पक्षी मांजामुळे जखमी झाले होते असल्याचे सांगण्यात आले. परळ पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून जखमी पक्ष्यांच्या शोधात रुग्णवाहिका फिरत असते. त्या प्रमाणे आज पर्यंत ७२ जखमी पक्षी आढळले.(फोटो सौजन्य – istock)
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
संक्रांतीदरम्यान पक्ष्यांच्या जखमा हा दरवर्षीचा प्रश्न आहे. पक्षी-प्राणी कल्याण आणि जागरूकता यावर प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यायला हवा. नायलॉन मांजाच्या विक्रीवर नियंत्रण, जनजागृती निर्माण करणे या बाबी अजूनही समाजात रुजल्या नाहीत.- डॉ. मयूर डंगर, रुग्णालय व्यवस्थापक, पशुवैद्यकीय रुग्णालय, परळ, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
संक्रात काळात पतंगबाजी होत असते, याची जाणीव असलेल्या पशु वैद्यकीय रुग्णालयाकडून या दिवसात मुंबई परिसरात जखमी पक्षांसाठी रुग्णवाहिका फिरत असते. यात अत्यावश्यक ती वैद्यकीय उपकरणे राखून ठेवली असतात. ही रुग्णवाहिका दादर, मशीद बंदर, परेल, कुलाबा, राजे छ. शिवाजी महाराज स्टेशन परिसर अशा मोठ्या परिसरात फिरत असल्याची माहिती डॉ. मयूर डंगर यांनी दिली.
मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, ‘मॅरेथॉन’ वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
शहरात दरवर्षी संक्रांतीदरम्यान पतंगबाजीमुळे पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असताना, यावर ठोस जागरूकता नसल्याचा आरोप प्राणीमित्र संघटनांकडून केला जात आहे. परळ येथील या पशु रुग्णालयात आणून पक्षावर उपचार केले जातात. उपचारानंतर त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले जाते.