
नांदेडमधील नाट्य
नांदेड: नायगाव पंचायत समितीचा कारभार सध्या ‘हम करे सो कायदा’ या मक्तेदारीच्या भावनेने सुरू आहे. भाजप-महायुती सरकार गरीबांच्या हिताच्या योजना राबवताना गोरगरीबांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेत आहे, पण नायगाव पंचायत समितीकडून मात्र त्या योजनांच्या आत्म्यालाच घोटले जात आहे. घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराचा बरबटलेला वास आमदार राजेश पवार यांच्या नाकापर्यंत पोहोचताच त्यांनी थेट धडक दिली आणि ‘शपथ विधी च्या एका अनोख्या प्रयोगाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
सोमवारी सकाळी अचानक पंचायत समिती कार्यालयात धडक देऊन आमदार पवारांनी हजेरीपुस्तक तपासलं आणि चित्र उघडं पडलं, अनेक अधिकारी गैरहजर, काही जण उशीरा येणारे, कामकाज ठप्प । संतप्त आमदारांनी विलंबाने आलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांचा “सत्कार” केला. या ‘गांधीगिरी’ ने उपस्थितांना क्षणभर गोंधळात टाकलं. हा भ्रष्टाचारविरोधी धडा होता की राजकीय स्टेजवरचा प्रयोग ?
नऊ अभियंते, तीन ऑपरेटर
गोरगरीब लोकांकडून नायगाव पंचायत समितीचे नऊ अभियंते व तीन कॉम्प्यूटर ऑपरेटर मरकाल योजनेच्या मंजुरीसाठी लाच घेत होते अशी कबुली त्यांनी स्वतः आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसमोरच काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याची कबुली दिली. आमदार पवारांनी त्यांच्याकडून ठाम शपथ घेतली. “मी घरकुल मंजुरीसाठी एक रुपयादेखील लाच घेणार नाही. माझं घर शासनाच्या पगारावर चालतं, गरीबांच्या पैशावर नाही. जर हे मान्य नसेल, तर मी या नोकरीचा राजीनामा देईन.”
नांदेड हादरलं! एका शिक्षकाने लॉजमध्ये पंख्याला गळफास लावून संपवलं जीवन
चौकशीअंती कारवाई
पैसे घेतल्याच्या कबुलीच 6 व्हिडिओ मी देखील पाहिला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना बोलावून मी चर्चा केलेली आहे. व्हिडिओची चौकशी होईल. चौकशीअंती दोषीविरुद्ध निलंबन, बडतर्फीसारखी कारवाई केली जाईल – राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड.
क्षणभर शांतता पसरली
या शपथविधी ने कार्यालयात क्षणभर शांतता पसरली, पण त्याच वेळी प्रश्नही डोकावला, साथ घेऊन भ्रष्टाचार संपते का? देशातल्या लाखो भ्रष्ट अधिका-यांनी असंच शपथ घेतल असतं, तर आज कारवाईची गरजच पडली नसती! गेल्या कॉभरापासून घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी येत होत्या. स्थानिक पत्रकार, कार्यकर्ते सतत आयाज उठवत होते. मग इतके दिवस आमदार गद्य कर होते? निवडणुकीच्या तोंडावर अचानकच ही जाग आली का?
नायगाव पंचायत समितीतील ही घटना एकाच वेळी दीन गोष्टी दाखवते. प्रशासनातला खतरनाक भ्रष्टाचार आणि राजकारणातली फोटो ऑप पोलीटिक्स’, पवार यांनी घेतलेली कारवाई कौतुकास्पद, पण ती केवळ नाटवमय दृश्यात अडकली. भ्रष्ट अधिकाऱ्याऱ्यांना निलंबनाचा इशारा देण्याऐवजी त्यांच्याकडून शपथ घेतली माणजे भ्रष्टाचाराचं रियालिटी शो रूप दाखवतं का? आमदर प्यार म्हणतात, हा मुद्दा मी हिवाळी अधिवेशनात मांडणार, पण लोक विचारतात् जेव्हा तक्रारी वर्षभरांपासून फिरत होत्या, तेवा अधिवेशनाची वाट का पाहिली? गरीबांच्या हक्काचा सवाल संसदेत नाही, तर गावीच सुटला असता! भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईसाठी आता शपथ नव्हे, कृती हवी निलंबन, चौकशी, गुन्हा दाखल यांसारख्या ठोस उपायाची. अन्यथा अशा घटना केवळ गांधीगिरी की नाटधगिरी या चर्चतच संपतील.
पुणे-नांदेड प्रवास होणार आणखी सुखकर; नवी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मार्गावर लवकरच धावणार
घरकुलाचे लाभार्थी
गोरगरिब लाभार्थ्यांना घरकुलाचे बिल काढायला पंचायत समितीचे उंबरे रिजावावे लागतात मात्र काही नेत्यांच्या शिफारशीने आलेल्या लाभाच्यर्थ्यांचे लगेच बिल निघते. तसेच एखादा व्यक्ती आमदारांपर्यंत तक्रार घेऊन आला तर’ आमदारापर्यंत का गेलास?” म्हणून देखील त्रास दिला जात नाहीत आहे. ऑपरेटर आणि इंजिनिअर यांच्या संगनमताने सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. शिवाय स्वतः कॉन्ट्रॅक्टर असलेले काही लोकांचे प्यादेच घरकुलासाठी इंजिनिअर म्हणून पुढे आलेले आहेत. प्रशासनास अनेकदा सांगूनही ते अगदी रेड्याच्या कातड्यागत ढिम्म आहेत. दलालांच्या आणि भ्रष्टाचा-यांच्या विळख्यात ‘प्रायव्हेट लिमिटेड’ झालेली नायगाव पंचायत समिती वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज जनतेमधून व्यक्त केली जात आहे.