Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोज जरांगेंनी उपोषण सोडताच लक्ष्मण हाकेंचा एल्गार; ‘त्यांची शरद पवारांसोबत समांतर लाईन’

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. तसेच 13 ऑगस्ट ही नवीन तारीख दिली आहे. त्यावरुन लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला असून शरद पवार यांचा उल्लेख केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 24, 2024 | 04:52 PM
लक्ष्मण हाके यांचा शरद पवार व जरांगे पाटलांवर निशाणा

लक्ष्मण हाके यांचा शरद पवार व जरांगे पाटलांवर निशाणा

Follow Us
Follow Us:

अहमदनगर : राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. आरक्षणावरुन राज्याचे वातावरण तापले असून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे. आज मात्र त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कधीच निवडणूक लढणार नाहीत असा दावा देखील हाके यांनी केला आहे.

जरांगे निवडणूक लढवणार नाहीत

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी राज्यभरामध्ये दौरा व सभा देखील घेतल्या. सध्या हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा सुरु असून यामधून त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी, जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आई बहिणीवर शिव्या घालाव्यात, ही काही निवडणूक लढवण्याची साधन आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. तसेच मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाहीत, हे मी पेपरवर लिहून देतो. त्यांची लढाई ही आरक्षणाची नसून फक्त वर्चस्वाची आहे, अशी घणाघाती टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

जरांगे पाटील फक्त तारीख पे तारीख देणार

पुढे त्यांनी ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा जरांगे पाटील यांचा डाव असल्याचा आरोप केला. हाके म्हणाले, ना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे, शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. जरांगे पाटील फक्त तारीख पे तारीख देऊ शकतो. याशिवाय जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत. निवडणुकीमध्ये कोणाविरुद्ध प्रचार करतात हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या नेत्याचा प्रचार करेल, निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही विचार नाही आणि मॉडेल नाही. आणि ते निवडणूक लढवणार देखील नाही, असा गंभीर दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Web Title: Obc leader laxman hake target maratha reservation manoj jarange patil also includes sharad pawar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange on Maratha Reservation
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

Laxman Hake: ‘…तर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पहिला सदस्य होईन’, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
1

Laxman Hake: ‘…तर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पहिला सदस्य होईन’, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा
2

‘सरकार मनोज जरांगे समोर लाचार, झुंडशाहीला बळी पडले,’ लक्ष्मण हाकेचा राज्य सरकारवर निशाणा

‘महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?’ मराठा समाजासाठी आठ योजनांच्या घोषणेवर लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल
3

‘महाराष्ट्र फक्त मराठा समाजासाठीच आहे का?’ मराठा समाजासाठी आठ योजनांच्या घोषणेवर लक्ष्मण हाकेचा सरकारला सवाल

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर
4

मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.