Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांवरून राजकीय नेत्यांना सुनावलं. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि पीकविम्याची रक्कम देण्याची मागणी करत त्यांनी सरकारसमोर पाच प्रमुख मागण्या मांडल्या.

  • By विवेक
Updated On: Oct 20, 2026 | 04:10 PM
Manoj Jarange Paatil dasara melava

Manoj Jarange Paatil dasara melava

Follow Us
Follow Us:
  • नारायणगडावरून मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना इशारा
  • शेतकऱ्यांसाठी हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
  • मनोज जरांगेंच्या सरकारकडे पाच प्रमुख मागण्या
 

दसऱ्यानिमित्त राजकीय मेळावे पार पडत असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही दसरा मेळावा आज पार पडला. बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे जरांगे पाटलांनी आपली तोफ डागली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारकडे पाच प्रमुख मागण्या मांडल्या.

याशिवाय जरांगे पाटलांनी यावेळी सरकारला इशारा देत 2029 च्या निवडणुकीत मराठा समाजबांधव उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं. 2029 च्या निवडणुकीत समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना पाठिंबा देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. (Manoj Jarange Patil Dasara Melava)

नारायणगडावरून नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

गेल्या तीन वर्षांत आपण स्वतःहून कोणत्याही नेत्याशी बोलायला गेलेलो नाही, असं सांगत जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना सुनावलं. पक्ष आणि नेत्यांवरील प्रेमापेक्षा समाजाचं हित महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. मराठा समाजातील लोक नेत्यांच्या पाठीशी उभे राहतात; मात्र समाजाच्या अडचणींकडेही लक्ष दिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 2029 च्या निवडणुकीत समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना पाठिंबा देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या!

राज्यातील शेतकरी संकटात असल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी सरकारकडे हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी केली. दुष्काळाचं सावट, शेतीतील नुकसान आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या असल्याचं त्यांनी भाषणात नमूद केलं. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मदत मिळाली तरी प्रवास, पेट्रोल आणि इतर खर्चातच मोठी रक्कम संपते, असं गणित त्यांनी मांडलं. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारकडे पाच प्रमुख मागण्या

जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी पाच मागण्या मांडल्या आहेत.

  • शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी.
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
  • पीकविम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
  • रखडलेलं कृषी अनुदान द्यावं.
  • गावागावांत चारा छावण्या सुरू कराव्यात.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरही नाराजी

कुणबी नोंदी सापडूनही काही ठिकाणी अर्ज स्वीकारले जात नसल्याचा आणि प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा जरांगे यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आपल्याला भेटण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, असं स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी आपल्या नावाचा वापर करून पैसे मागणाऱ्यांना इशारा दिला. अशा प्रकाराबाबत माहिती मिळाल्यास संबंधितांना सोडणार नसल्याचंही ते म्हणाले.

आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतं आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे कोणती पावलं उचलली जातात, याकडे लक्ष लागलं आहे.

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे कोणत्या मागण्या केल्या?

    Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, संपूर्ण कर्जमाफी, पीकविम्याची पूर्ण रक्कम, रखडलेलं अनुदान आणि गावागावांत चारा छावण्या सुरू करण्याच्या पाच मागण्या त्यांनी मांडल्या.

  • Que: 2029 च्या निवडणुकीबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?

    Ans: मराठा समाजाच्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांना 2029 च्या निवडणुकीत निवडून येऊ द्यायचं नाही, असं आवाहन जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील भाषणात केलं.

  • Que: जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी किती मदत मागितली?

    Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय संपूर्ण कर्जमाफी आणि पीकविम्याची रक्कम जमा करण्याची मागणीही केली.

Web Title: Manoj jarange patil dasara melava 2026 narayangad vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Beed News
  • Dasara Melava
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video
1

‘मी रावण आहे, रस्त्यावरचा चोर नाही!’ चप्पल पडताच संतापला लंकेश; पाहा Viral Video

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
2

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द
3

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश
4

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.