Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर लाठीने हल्ला करण्यात आला. यावरुन हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 28, 2025 | 03:06 PM
OBC leader Laxman Hake target Sharad Pawar attacked on car Maharashtra political news

OBC leader Laxman Hake target Sharad Pawar attacked on car Maharashtra political news

Follow Us
Close
Follow Us:
  • ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला
  • यानंतर हाके यांनी प्रतिक्रिया देत तीव्र निषेध केला
  • लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला

Laxman Hake Marathi News : बारामती : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील चर्चेत आले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेकदा त्यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने देखील केली आहे. मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी (दि.27) रोजी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस सुरक्षा असताना देखील हा हल्ला झाल्यामुळे लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नाही. यावेळी पोलीस देखील असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी झालेल्या या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणारा जो दळवी आणि त्याचे सहकारी आहेत यांचे फोटो आता समोर आले आहेत आणि यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत देखील आहेत, या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत. आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला, अशा स्पष्ट शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप केला.

अंतर्गत विवाहाबद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला

पुढे लक्ष्मण हाके म्हणाले की, माझ्यावर आजपर्यंत ८ ते ९ हल्ले झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. हल्लेखोरांवर कारवाई झाली असती तर मला आज संरक्षण द्यायची सुद्धा गरज पडली नसती. पोलिसांचा संरक्षण असताना देखील काल माझ्यावर हल्ला झाला, या लोकांना वर्दीची भीती नसावी, यांना माहिती आहे की हल्ला केल्यावर काहीच होत नाही, अजून अनेकांवर हल्ला करतील. हे आता सांगत आहेत की अंतर्गत विवाहाबद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला केला, या लोकांना कल्पना नाही की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावून दिले होते, यांना शाहू महाराज कळायला यांच्या पुढच्या शंभर पिढ्या जातील, अशा शब्दांत ओबीसीनेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे लक्ष्मण हाके म्हणाले की, हल्ल्यात 10 ते 12 जण सहभागी होते. पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असूनही हल्लेखोरांनी दोन ते तीन फुटांचे बांबू घेऊन आमच्यावर बेछूट प्रहार केला. अवघा दहा सेकंदांचा जरी उशीर झाला असता तरी बांबू थेट आमच्या डोक्यात बसले असते. महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचे काम या मंडळींनी केलं आहे. पाहुण्या रावळ्यांचं राज्य या लोकांनी महाराष्ट्रावर आणलं, सहकारी संस्था यांच्या नावावर केल्या. महाराष्ट्र राज्यातला 50 ते 60% ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे, हा समाज आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडले

Web Title: Obc leader laxman hake target sharad pawar attacked on car maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • Laxman hake
  • OBC Reservation
  • political news

संबंधित बातम्या

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा
1

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण
2

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?
3

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी
4

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.