मराठवाडा विदर्भप्रमाणेच राज्यातील इतर भागात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यासह आता मुंबई आणि उपनरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्य़ाने दिला आहे. येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
काल रात्रीपासूनच विजांच्या गडगडाटासह मुंबई, ठाणे पालघर आणि इतर कोकण भागात पावसाची जोरदार बॅटींग पाहायला मिळत आहे. आधीच मेगा ब्लॉक आणि त्यात पावसाची जोरदार बॅटींग यामुळे लोकल वाहतूकीवर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे येत्या 24 तासांत अतिमुसळधार पाऊस आणि त्य़ाचबरोबर वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज साधारणतः आकाश ढगाळ राहील. तसंच जोरदार ते अतिजोरदार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज सकाळपासून याचा लोकल वाहतूकीवर देखील परिणाम होताना दिसत आहे.
दादर, अंधेरी सबबे, घोडबंदर या ठिकाणी वाहतकूक मंदावली असून चाकरमान्यांना सकाळीच कामाला जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. आजची रात्र ही मुंबईकरांसाठी खबरदारीची असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शनिवारी आणि आज देखील पापसाचा फटका लोकल वाहतूकीवर देखील झाला आहे. मेगा ब्लॉकमुळे आणि पावसामुळे लोकल वाहतूक तीस ते चाळीस मिनिटे उशीराने येत आहे.गेल्या चोविस तासात मुंबईत पावसाची सर्वाधिक नोंद 100मिमीपेक्षा अधिक झाली आहे.
शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० दरम्यान कुलाबा १२० मिमी पावसाची नोंद
जुहू ८८ मिमी,
सांताक्रूझ ८३.८ मिमी,
वांद्रे ८२.५ मिमी,
महालक्ष्मी येथे २८ मिमी पावसाची नोंद इतक्या पावसाची नोंद झाली आहे.