धक्कादायक ! लग्न मंडपातच तरुणाची निर्घृण हत्या; किरकोळ कारणावरून तरूणाला संपवलं
गडचिराली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील गुंडापुरी येथे वृद्ध आजी-आजोबासह नातीची हातोड्याने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आता गुंडापुरीतील या तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली जिल्हा हादरला आहे. अर्चना रामशे तलांडे (10, येरकल, एटापल्ली), देवू दसरू कुमोती (60) आणि बिच्छे देवू कुमोती (55, दोघेही, गुंडापुरी, भामरागड) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडापुरी येथे देवू व पत्नी बिच्चे कुमोटी हे वृद्ध दाम्पत्य राहत होते. त्यांची विवाहित मुलगी एटापल्ली तालुक्यातील मरकल येथे राहायची. चौथीच्या वर्गात शिकणारी तिची मुलगी अर्चना तलांडे ही दिवाळीच्या सुट्टीत आजी-आजोबांकडे आली होती. घरात आजी-आजोबांसह अर्चनाचा मृतदेह आढळून आला. या तिहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती प्राप्त होताच हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव दडस यांच्या नेतृत्वात बुर्गी (कांदोळी) ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संपत्तीच्या वादातून हत्याकांड घडवून आणल्याचा संशय असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.