Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन: भारतीय तटरक्षक दलाने भाट्ये किनाऱ्यावर जमा केला ४५० किलो कचरा

भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी या स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले होते. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो.

  • By नारायण परब
Updated On: Sep 21, 2024 | 11:31 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो. याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते. यावर्षी, भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले.

यावेळी मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, कस्टम्स, एनसीसी कॅडेट्स, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

स्वच्छता मोहिम कार्यक्रमाचे उद्घाटन तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी गिरीश चंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी तटरक्षक अवस्थान यांचे बरोबरच तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी यांचे सर्व अधिकारी व जवान यांनी या कार्यक्रमाचे हिरारीने नियोजन केले आणि सहभाग नोंदवला. याव्यतिरिक्त कार्यक्रमात विविध संस्थांचे व शाळांचे सुमारे ३०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.

स्वच्छता मोहिमे दरम्यान एकूण ४५० किलो कचरा जमा केला गेला

स्वच्छता मोहिमे दरम्यान एकूण ४५० किलो कचरा जमा करण्यात आला. बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिक स्वतंत्रपणे गॅश बॅगमध्ये गोळा केला गेला. कचरा वर्गीकरण करून पुढील विल्हेवाटीसाठी नगर पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.

हे देखील वाचा-पुढील 2 महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडणार- केंद्रीय मंत्री चंद्रकात आर पाटील

आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन आणि भारतातील स्वच्छता मोहिम

1986 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या स्वच्छतेच्या कार्यक्रमासह, समुद्र संरक्षणाद्वारे किनारपट्टी स्वच्छता दिवसाची सुरुवात  करण्यात आली. आता, दर वर्षी, सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. भारतीय तटरक्षक दलातर्फे या दिवशी देशातील सर्व किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. विविध नागरी संस्था, केंद्र आणि राज्य सरकारी संस्था, महापालिका, स्वयंसेवी संस्था, मत्स्यपालन संघटना,  तेल संस्था आणि इतर खाजगी उद्योग या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभागी होतात. महाविद्यालयातील उत्साही NCC कॅडेट्स, NSS कार्यकर्ते शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यी या मोहिमेत सहभागी होतात. या दिनाद्वारे  तरुण पिढीमध्ये जागरूकता आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांबद्दलची त्यांची बांधिलकीची जाणीव करुन दिली जाते.

 

Web Title: On international coastal cleanup day indian coast guard collects 450 kg of garbage on bhatye beach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 11:31 PM

Topics:  

  • Indian Coast Guard

संबंधित बातम्या

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025: 2027 बॅचसाठी मोठी संधी, लवकर करा अर्ज
1

भारतीय तटरक्षक दल सहाय्यक कमांडंट भरती 2025: 2027 बॅचसाठी मोठी संधी, लवकर करा अर्ज

आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश
2

आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.