डोंबिवली : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी हॅपी खड्डे डेचा बॅनर लावणारे दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत होता. त्याच वेळी त्याचे राजकीय मित्र रमेश म्हात्रे यांच्या विरोधात पोलिसांनी तडीपारीची नोटिस काढण्याची प्रक्रिया सुरु केली. आत्ता आणखीन एक तडीपारीची नोटिस काढली जाणार आहे. म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या आधीच निवडणूकीच्या तयारीत असलेल्या नेत्यांची गळाभेटीमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. आत्ता एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या सुरु झाल्या आहेत.
डोंबिवली विधानसभा ही भाजप आणि आरआरएसचा बालेकिल्ला आहे. २००९ सालापासून डोंबिवली विधानसभा मतदार संघातून रविंद्र चव्हाण हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहे. त्यावेळी मनसेत असलेले राजेश कदम आणि रविंद्र चव्हाण यांच्यात १३ हजार मतांचा फरक होता. तेव्हा चव्हाण हे निवडून आले. २०१४ साली युती तुटली. रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली. चव्हाण यांनी म्हात्रे यांचा ४५ हजार मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये रविंद्र चव्हाण यांच्यासमारे मनसेचे मंदार हळबे हे उभे होते. हळबे देखील जवळपास त्याच मतांनी पराभूत झाले. आत्ता राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याचा भाजपवर काही परिमाण झालेला नाही. रविंद्र चव्हाण यांनी त्यांची ताकद वाढली आहे. सध्या ते सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी मतदार संघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला.
हेदेखील वाचा – Pune Crime News: वॉशिंग सेंटरवर दरोडा टाकणं भोवलं; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
खासदार शिंदे यांनीही कोट्यावधीचा निधी दिला आहे. महायुतीत ही जागा भाजपकडे असणार यामध्ये काही दुमत नाही. आत्ता शिवसेना शिंदे गटातील इच्छूक दीपेश म्हात्रे हे करणार काय ? त्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग निवडला असल्याची चर्चा आहे. काही दिवसापासून त्यांच्याकडून चव्हाण यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवशी म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलेला बॅनर म्हात्रे यांच्या अंगाशी आला आहे. विष्णूनगर पोलिसांनी बॅनर छापणाऱ्या जॉली प्रिंटरसह दीपेश म्हात्रे यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नाही तर रमेश म्हात्रे यांच्या विरोधात तडीपारीची नोटीस दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशी माहिती आहे की आणखीन एक तडीपारीची नोटीस काढली जाणार असल्याची चर्चा आहे. आत्ता या सर्व घडामोडींमुळे एकतर बाब स्पष्ट आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जे राजकारण सुरु आहे. ते कुठे थांबणार याचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.