Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीत कांदा रडवणार! आता भाव 70 रुपये किलो, दिवाळीपर्यंत शंभरी गाठणार?

श्रावण संपल्यानंतर आता कांद्याची मागणी देखील वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पावसामुळे आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असून ऐन सणासुदीत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 06, 2024 | 09:07 AM
कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!

कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; वाचा... किती रुपयांना मिळणार!

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्यानंतर कांद्याची मागणी देखील वाढल्याचे पाहयला मिळत आहे. तर पावसामुळे आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कांद्याची आवक वाढणार नाही. अशा स्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता असून ऐन सणासुदीत कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात कांदा ५०० रुपये प्रति १० किलो दराने मिळतो. दिवाळीपर्यंत याच कांद्याचा भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कांद्यामध्ये दरवाढ

दोन महिन्यांपूर्वी घसरलेले कांद्याचे भाव आवक घटल्याने पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. घाऊक बाजारात पुणे व नगर जिल्ह्यातून कांद्याची आयात केली जात आहे. घाऊक बाजारात कांद्याला 500 रुपये प्रति 10 किलो भाव आहे. येथे दररोज 50 ते 60 ट्रक बाजारात दाखल होत आहेत. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत आवक कमी राहील, त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:  टोमॅटो 100 रुपये किलो; दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता, वाचा… नेमकं कारण?

जुन्याचा दर्जा चांगला

गोदामांमध्ये साठवलेल्या जुन्या कांद्याची आवक सुरूच आहे. या कांद्याचा दर्जा चांगला आहे. नवीन कांद्याची आवक नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होते. तोपर्यंत तोच जुना कांदा बाजारात राहील. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 70 रुपये किलो असून दिवाळीपर्यंत तो 100 रुपयांपर्यंत पोहोचेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

कांद्याची मागणी वाढली

परदेशातून कांद्याला मोठी मागणी आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतून मागणी असल्याने मार्केट यार्डातून दररोज 30 ते 40 गाड्या कांद्या दक्षिण भारतात जात आहेत. पुढील महिन्यात कर्नाटकात नवीन कांद्याची आवक होईल. त्यामुळे तेथील मागणी काही प्रमाणात कमी होईल. मात्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून मागणी कायम राहणार आहे. कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले की, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव पुढील तीन महिने वाढणार आहेत.

बाजारातील कांद्याचे दर (घाऊक किरकोळ)

50 ते 70 रुपये किलो
10 किलो रुपये 500 रुपये 700

Web Title: Onion price hike monsoon fury in maharashtra affects the prices in delhi markets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:07 AM

Topics:  

  • maharashtra
  • Onion News

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.