Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही…”; OSD मंगेश चिवटेंनी सांगितला हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लॅंडिंगचा थरार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय मानला जात आहे .त्यांचा नियोजित दौरा आटोपून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर मागवले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 18, 2024 | 09:19 PM
"जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही..."; OSD मंगेश चिवटेंनी सांगितला हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लॅंडिंगचा थरार

"जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि आम्ही..."; OSD मंगेश चिवटेंनी सांगितला हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लॅंडिंगचा थरार

Follow Us
Follow Us:

सातारा: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या त्यांच्या गावी एक दिवसाच्या दौऱ्याकरता आले होते. दरम्यान हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होत असताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरे गावातील हेलिपॅड वर उतरवण्याची वेळ आली. मात्र तातडीच्या कामासाठी मुख्यमंत्री शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे

राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून निवडणुकांच्या प्रक्रियेची तयारी जोरात सुरू आहे . अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री हेलिकॉप्टरने आपल्या मूळ गावी रवाना झाले होते. आज पुन्हा मुंबईला परत जाताना ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाला अडथळा निर्माण झाला .हेलिकॉप्टरने दरे येथील हेलिपॅड वरून उड्डाण घेतले होते मात्र खराब हवामाना असल्यामुळे हेलिकॉप्टरने पुढे जाणे अशक्य असल्याचे पायलटने सांगितले.  त्यामुळे पुन्हा हेलिकॉप्टर तातडीने माघारी वळून हेलिपॅड वर उतरवण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा अत्यंत गोपनीय मानला जात आहे .त्यांचा नियोजित दौरा आटोपून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर मागवले होते.  मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर चे उड्डाण रद्द झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोटारीने मुंबईला रवाना झाले आहेत.

मंगेश चिवटे यांनी सांगितला थरार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आणि ओएसडी मंगेश चिवटे यांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे गावातून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी माझ्यासह दोघे जण हेलिकॉप्टरमध्येच होतो. पुण्याला जाताना अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात हेलिकॉप्टर भरकटायला लागले. कोयना बॅकवॉटरच्या अगदी १५ फुट हेलिकॉप्टर खाली आले होते.

हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी आजूबाजूला योग्य जमीन मिळत नव्हती. शेवटी आम्ही ज्या ठिकाणी टेक ऑफ केले त्याच दरे गावात लँड करावे लागले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वाहनाने पुण्याला रवाना झाले आहेत. राज्यातील १३ कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.

Web Title: Osd mangesh chivte said cm eknath shinde helicopter emergency landing koyna backwater satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 09:19 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Helicopter Emergency Landing

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा
1

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील टीका खपवून घेणार नाही; शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा जरांगे पाटील यांना इशारा

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन
2

Eknath Shinde: पालघरमध्ये डॉक्टरांसोबत गैरवर्तन भोवले; शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
3

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
4

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.